Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडकोकडून १६ भूखंडावर जप्ती, राजकीय नेत्यांना धक्का

गेली अनेकवर्ष अतिरिक्त भाडेपट्टा तसेच सेवाशुल्क थकवलेल्या सिडको क्षेत्रातील १६ भूखंडांवर सिडकोने जप्तीची कारवाई केली. त्यामुळे नवी मुंबईतील बड्या राजकीय नेत्याला धक्का देण्याचा प्रयत्न थेट सिडकोने केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2025 | 09:41 AM
CIDCO(फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

CIDCO(फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई, गेली अनेकवर्ष अतिरिक्त भाडेपट्टा तसेच सेवाशुल्क थकवलेल्या सिडको क्षेत्रातील १६ भूखंडांवर सिडकोने जप्तीची कारवाई केली. यात नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर तर पनवेल भागातील खारघर व उरणमधील द्रोणागिरी नोडमधील भूखंडांचा समावेश आहे. सिडकोने कारवाई केलेल्या वाशीतील भूखंडावर देखील जप्तीची कारवाई केली गेली असून, त्यामुळे नवी मुंबईतील बड्या राजकीय नेत्याला धक्का देण्याचा प्रयत्न थेट सिडकोने केला आहे. ९८ साली हे १६ भुखंड सिडकोने वाटप केले होते. मात्र, तेव्हापासून या भूखंडाचा अतिरिक्त भाडेपट्टा, सेवाशुल्क भरण्यास टाळाटाळ केली जात होतो. यावर्षी सिडकोने अभय योजना काढली होती.

मुंबई पोलीस होणार आता आणखी स्मार्ट,सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणार

भोगवटा प्रमाणपत्र बंधनकारक
जवळपास ७५ हजार चौ. मीटरचे भूखंडांचा यात समावेश आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारताना जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. मात्र १९९८ साली भु धारकांनी अगदी स्वस्तात भुखंड घेतले होते. नियमानुसार ४ वर्षांत भूखंडाचा विकास कारण भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. भूखंडाचा विकासच केला नसल्याचे निष्पन्न झाले. भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे.

वाशीतील भूखंडावर राजकीय डोळा ?

वाशी सेक्टर २६, कोपरी येथील तब्बल ३८ हजार चौ. मीटर भूखंडावर देखील सिडकोने जप्ती आणली आहे. कोपरी येथील व्यापाऱ्यांसाठी राखीव असलेल्या एका भूखंडावर बांधकाम परवानगीच्या किचकट परवानगी प्रक्रियेत अडकवून टाकण्यात आले होते. मोठे संकुल या ठिकाणी उभारण्यात येणार होते. ५०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना सदस्य बनविण्यात आले होते. मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या भूखंडाची बाजारभावानुसार हजारो करोडच्या घरात किंमत आहे. व्यापाऱ्यांना बाजूला सारून आता या भूखंडावर नवी मुंबई शहरातील एका बड्या नेत्याने नजर टाकली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांना या भूखंडावर पाणी सोडण्याची वेळ आली होती.

विहित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्यात अयशस्वी झालेल्या भूखंडधारकांचे भाडेपट्ट्याचे करारनामे सिडको महामंडळाने रद्द केले आहेत. भाडेपट्टा तसेच सेवा शुल्ख देखील भुखंड धारकांनी थकवले होते.  अॅम्नेस्टी योजनेंतर्गत मुदतवाढ मंजूर करण्यासाठी अतिरिक्त भाडेपट्टा प्रीमियम भरण्यात अयशस्वी ठरल्याने अखेर, सिडकोच्या एमटीएस-१ विभागाने नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सुमारे ५३ हजार चौरस मीटर क्षेत्राचा ताबा घेतला आहे. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Cidco seizes 16 plots shocks political leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • cidco
  • cidco news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
1

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती
2

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
3

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”
4

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.