Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल

नगरसेविका सोनवी लाड यांनी आपल्या भूमिकेतून प्रशासनाच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिक आणि तरुणांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या उभारणीसाठी 38 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे प्रशासनाला ओझे वाटते का, असा सवाल त्यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 15, 2026 | 07:49 AM
सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सोनवी लाड यांचा प्रशासनाच्या खर्चाच्या नियोजनावर प्रश्न.
  • सामान्य नागरिक आणि तरुणांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याबद्दल नाराजी. 
  • केवळ एका रात्रीच्या मनोरंजनासाठी ४८ कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित.

नवी मुंबई : सामान्य नागरिक आणि तरुणांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांवर खर्च करण्यास प्रशासनाकडे निधी नाही का? असा सवाल नवी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सोनवी लाड यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्याऐवजी केवळ एका रात्रीच्या मनोरंजनासाठी 48 कोटी रुपये खर्च केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांसाठी दीर्घकाळ उपयोगी ठरणाऱ्या सुविधांवर गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील अनेक भागांत राज्य सरकार असो वा संबंधित महापालिका त्यांच्या भागांतील विकासकामे केली जात आहे. मात्र, नवी मुंबईतील काही विकासकामांच्या मुद्यांवरून सोनवी लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेविका सोनवी लाड यांनी आपल्या भूमिकेतून प्रशासनाच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिक आणि तरुणांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या उभारणीसाठी 38 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे प्रशासनाला ओझे वाटते का, असा सवाल त्यांनी केला. एका बाजूला अनेक वर्षे टिकणाऱ्या आणि नागरिकांना सातत्याने उपयोगी पडणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे केवळ एका रात्रीच्या मनोरंजनासाठी 48 कोटी रुपये खर्च केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

वाशी येथे अशा प्रकारच्या संकुलाची आवश्यकता नसल्याचे कारण दिले जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र, वाशी हे नवी मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असून शहरातील विविध भागांतून नागरिकांना येथे सहज पोहोचता येते. त्यामुळे वाशीमध्ये आवश्यक सोयीसुविधांचे संकुल उभारणे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते, असे मत त्यांनी मांडले.

FAQ

1. प्रशासनाला सवाल कोणी उपस्थित केला आहे?

नवी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सोनवी लाड यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

2. सोनवी लाड यांनी कोणत्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली?

सामान्य नागरिक आणि तरुणांसाठी आवश्यक सोयीसुविधांवर खर्च करण्याऐवजी मनोरंजनासाठी मोठी रक्कम खर्च केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

3. मनोरंजनासाठी किती खर्च केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला?

एका रात्रीच्या मनोरंजनासाठी ४८ कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Corporator sonavi lad aggresive for development work nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 07:49 AM

Topics:  

  • Development Work
  • Mumbai News
  • Navi Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

Health Update: निधीअभावी डायलिसीस उपचारांना ब्रेक लागणार? दररोज ७२६ डायलिसिस सत्रांची जबाबदारी, काही ठिकाणी सेवा खंडित
1

Health Update: निधीअभावी डायलिसीस उपचारांना ब्रेक लागणार? दररोज ७२६ डायलिसिस सत्रांची जबाबदारी, काही ठिकाणी सेवा खंडित

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी
2

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण
3

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
4

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.