Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

Mumbai News : मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. सांस्कृतिक गाणी कशासाठी वाजवली याबाबत रेल्वेने स्पष्टता दिली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 04:51 PM
Mumbai Raliway Station

Mumbai Raliway Station

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील विविध रेल्वे स्तहनकांवर वाजली भोजपुरी गाणी
  • भोजपुरी गाणी वाजवल्याबद्दल रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
  • किशोरी पेडणेकरांची फडणवीसांवर टीका
 

मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. छठपूजेच्या निमित्ताने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. यावरून ठाकरे गट, मनसेसह विविध संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. मात्र, रेल्वेच्या स्पष्टीकरणानंतरही मराठी विरुद्ध भोजपुरी असा नवा वाद रंगताना दिसत आहे. (Mumbai News)

भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं रेल्वेचं कारण काय?

छठपूजेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून मुंबईमार्गे बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पुढील तीन ते चार दिवसांत दररोज तब्बल 50 ते 60 हजार प्रवासी प्रवास करत असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. या प्रवाशांच्या सांस्कृतिक भावनांचा विचार करून उद्घोषणांच्या दरम्यान सांस्कृतिक गाणी वाजवली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.

मात्र, या निर्णयावरून आता स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध राजकीय संघटना आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या बिगर राजकीय संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. यामुळॆ आता पुन्हा मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे.

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

किशोरी पेडणेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. ‘महाराष्ट्राला बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का?’ असा सवाल करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

यूपी आणि बिहारमध्ये सुधारणा होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र महाराष्ट्राला त्याच दिशेने घेऊन जात असल्याची टीका त्यांनी केली. संविधान बदलण्याच्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

‘बिहारमध्ये महाराष्ट्राची गाणी लावणार का?’

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी मोठ्या आवाजात वाजवली जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. रेल्वेच्या महत्त्वाच्या उद्घोषणा आणि वेळापत्रकाच्या सूचना बाजूला ठेवून गाण्यांना प्राधान्य दिलं जात असेल, तर हा प्रकार चुकीचा असल्याचं त्या म्हणाल्या.

‘उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राची गाणी लावली जातील का?’ असा सवालही त्यांनी केला. आम्ही गाण्यांच्या विरोधात नाही, मात्र स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी का वाजवण्यात आली?

    Ans: छठपूजेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून दररोज 50 ते 60 हजार प्रवासी बिहार आणि उत्तर प्रदेशला जात असल्याने त्यांच्या सांस्कृतिक भावनांचा विचार करून उद्घोषणांच्या दरम्यान गाणी वाजवण्यात आल्याचं रेल्वेने सांगितलं.

  • Que: भोजपुरी गाण्यांवरून किशोरी पेडणेकर यांनी काय टीका केली?

    Ans: किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राची गाणी वाजवली जातील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • Que: भोजपुरी गाण्यांबाबत रेल्वेने काय स्पष्टीकरण दिलं?

    Ans: मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्या माहितीनुसार, छठपूजेसाठी पुढील तीन ते चार दिवसांत दररोज 50 ते 60 हजार प्रवासी महाराष्ट्रातून बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणार आहेत. त्यामुळे उद्घोषणांच्या दरम्यान सांस्कृतिक गाणी वाजवली जात असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं.

Web Title: Mumbai news mumbai railway bhojpuri songs railway clarification vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Chhath Puja
  • Mumbai local train
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
1

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Chhath Puja 2026: छठ पूजेत बांबूच्या सूप आणि दौऱ्याचेच महत्त्व का? पितळ आणि स्टीलच्या भांड्यांबाबत जाणून घ्या धार्मिक श्रद्धा
2

Chhath Puja 2026: छठ पूजेत बांबूच्या सूप आणि दौऱ्याचेच महत्त्व का? पितळ आणि स्टीलच्या भांड्यांबाबत जाणून घ्या धार्मिक श्रद्धा

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?
3

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण
4

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.