Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवडाभर अग्निशमनसेवा सप्ताह मॉक ड्रीलचे होणार सादरीकरण; मुंबई महानगरपालिकेचा नियोजित कार्यक्रम

मुंबई: मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने मुंबईत व्यापक जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2025 | 08:27 AM
mock drill (फोटो सौजन्य- pinterest )

mock drill (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने मुंबईत व्यापक जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. मुंबई १४ ते २० एप्रिलदरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहात विविध रुग्णालये, व्यापारी निवासी संकुल, शाळा येथे प्रात्यक्षिक आणि रंगीत तालमीचे (मॉक ड्रील) सादरीकरण करण्यात येणार असून प्राथमिक अवस्थेतील आग शमवणे, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालय प्रांगणात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

मुंबईकरांचा त्रास वाढणार; बेस्टच्या १०० बस जाणार भंगारात

मुंबई गोदीतील एस. एस. फोर्ट स्टिकीन या बोटीमध्ये १४ एप्रिल १९४४ रोजी महाप्रचंड स्फोट होऊन गोदीमध्ये भीषण आग लागली होती. या अग्निप्रलयाशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ जवान व अधिकारी वीरगती प्राप्त झाली होती. अग्निशमन सेवेतील वीरांना मानवंदना देण्यासाठी भारत सरकारने १९६८ मध्ये १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून १४ एप्रिल ते २० एप्रिल हा सप्ताह अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो.

१८ एप्रिलला महापालिका आयुक्त उपस्थित राहणार

वार्षिक अग्निकवायत स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन १८ एप्रिल रोजी भायखळा येथील प्रादेशिक समादेश केंद्रात करण्यात आले असून या कार्यक्रमास भूषण गगराणी उपस्थित राहणार आहेत. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उपआयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अग्निसुरक्षाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने

यंदाही या सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील शाळा आणि रहिवासी संकुलाच्या ठिकाणी अग्निसुरक्षेवरील व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्याचे उपाय आदीची माहिती देण्यात येणार आहे. आग लागल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, १२५ शाळा आणि रहिवासी संकुल येथे अग्निसुरक्षेवरील व्याख्याने, तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्याचे उपाय आदींची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटर, इएसआयसी रुग्णालय (कांदिवली), फोर्टिस रूग्णालय (मुलुंड), भाटिया रुग्णालय (ताडदेव), लोकमान्य टिळक रुग्णालय (शीव) आदी ठिकाणी प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम सादर करण्यात येणार आहे. मुंबईतील उंच इमारती, निवासी चाळी, व्यापारी संकुले यांसारख्या ठिकाणी भित्तिपत्रके प्रदर्शित केली जतील.

 

Web Title: Fire service week mock drill to be presented throughout the week mumbai municipal corporations planned program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • Fire Brigade
  • Mock Drill
  • Mumbai

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.