Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच सरकारी तिजोरीवरील अर्थसंकल्पीय ताणही वाढत गेला, ज्याचा फटका सरकारच्या इतर प्रमुख योजनांना बसला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2026 | 10:06 AM
राज्यातील महायुती सरकारचा वसुलीचा विचार सुरू

राज्यातील महायुती सरकारचा वसुलीचा विचार सुरू

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारची गेमचेन्जर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ९६०५ कोटी रुपये बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांमध्ये वाटले गेल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय अहवालानुसार, सुमारे ९२ लाख अपात्र व्यक्तींनी या आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकार आता अशा बनावट लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची योजना आखत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच सरकारी तिजोरीवरील अर्थसंकल्पीय ताणही वाढत गेला, ज्याचा फटका सरकारच्या इतर प्रमुख योजनांना बसला. या योजनेमुळे फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत मासिक खर्च ३६४० कोटी रुपयांहून अधिक झाला. जर ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांना वगळले असते, तर हा खर्च केवळ २४५० कोटी रुपये झाला असता. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.

तपासात उघडकीस आल्या त्रुटी

तपास अहवालात या घोटाळ्यातील विविध प्रकार समोर आले आहेत. भीतीपोटी सुमारे ६२ लाख लोकांनी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया अपूर्ण सोडल्याचे मानले जात आहे. याशिवाय, १६ लाख लोक हे निश्चित उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्नाचे आढळले, १८ लाख लाभार्थ्यांचे वय ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते, तर २५ लाख प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे नोंदवली गेली होती.

केवळ कर्मचाऱ्यांकडूनच वसुली

महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, सामान्य नागरिकांकडून दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाही. मात्र, नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या ४.५ लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैन पै वसूल करण्याचा विचार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत.

खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचण्यास मदत

केवळ खऱ्या व पात्र लाभार्थीपर्यंतच योजनेचा निधी पोहोचावा आणि सरकारी निधीचा गैरवापर टळावा, हाच যা पडताळणीमागील सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, थेट ९२ लाख लाभार्थी कमी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य जनतेत योजनेच्या अमलबजावणीवरून उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

CJP School Theek Karo Latur : बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

Web Title: Funds worth 9605 crore distributed to ineligible women under the ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Government Scheme
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
1

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
2

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती  मुख्य कारणे?
3

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती मुख्य कारणे?

शेतीला पर्यटनाची जोड; पर्यटन विभागाद्वारे कृषी पर्यटन धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन
4

शेतीला पर्यटनाची जोड; पर्यटन विभागाद्वारे कृषी पर्यटन धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.