अतिक्रमणचा पदभार सुटेना; महानगरपालिका आयुक्त झाले हतबल
घणसोली ‘एफ’ विभागात अतिक्रमण लिपिक मिळत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे, कारण तेथील कार्यरत अधिकाऱ्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. बदली होऊनही अधिकारी जागेवरच आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्याचे बोलले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली ‘एफ’ विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांची बदली २३ मे रोजी झाली होती, तरीही त्यांनी अद्याप नवीन ठिकाणी पदभार स्वीकारलेला नाही. याशिवाय, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी ६ जून रोजी पदोन्नती मिळालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी पदभार सोडला नसल्याचे समजते.
Mumbai Metro : मिरा-भाईंदरहून थेट मुंबईत पोहचता येणार; मेट्रो-७ अ लवकरच सेवेत
अतिक्रमण विभागातील ‘चिकटून’ राहण्याचे कारण काय ?
अतिक्रमण विभाग हा नेहमीच संवेदनशील आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई करणे किवा त्यांना संरक्षण देणे या दोन्ही गोष्टींमुळे या विभागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता असते. त्यामुळे, बदली होऊनही हे अधिकारी पदभार न सोडण्यामागे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. काही स्थानिक नागरिकांच्या मते, हे अधिकारी विशिष्ट अतिक्रमणांना संरक्षण देत असल्यामुळे किंवा त्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळत असल्यामुळे आयुक्तांनी आदेश देऊनही अद्याप अतिक्रमण विभागातील अधिकारी त्याच विभागात विकटून असून, आयुक्तांच्या आदेशाला ‘वाटण्याच्या अक्षता’ दाखवण्यात येत आहेत.
महानगरपालिका आयुक्त झाले हतबल
संबंधित अधिकारी/कार्यालयप्रमुख यांना सूचित करण्यात आली आहे की, उप अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (यांत्रिकी), सहाय्यक अभियंता (विद्युत) व सिस्टर इन-चार्ज / नाईट सुपरवायझार यांना पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करून त्याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. मात्र अधिकाऱ्यांना पदभार सूटत नसल्याने आयुक्त हतबल झाले आहेत की काय असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
राजकीय दबावामुळे पदभारास नकार
आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्या जागी आलेल्या अधिकाऱ्यांनीही राजकीय दबावा आणून पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्कुणी अधिकारी देताय का?₹ अशी विचारणा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पालिका आयुक्त मौन, नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह
सद्यस्थितीत असलेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा जास्त झाल्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्यास आयुक्तांनी मूक संमती दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घणसोली विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू असतानाही, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’ केले जात असल्याचा आरोप होऊ लागले आहे.
अतिक्रमण विभागातील गैरप्रकार थांबेनात
अतिक्रमण विभाग हा शहरातील सुव्यवस्थेशी थेट संबंधित असल्याने, या विभागातील गैरप्रकार आणि दिरंगाई तत्काळ थांबवणे गरजेचे आहे. या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे महापालिका प्रशासनाची प्रतिमा डागाळत असून, यावर तातडीने कठोर उपाययोजना न केल्यास, मोठ्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रशासनातर्फे कठोर कारवाईची मागणी
न्या गंभीर प्रकाराबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ बदलीचे आदेश काढून उपयोग नाही, तर ते प्रभावीपणे अंमलात आणणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जर अधिकारी बदली होऊनही पदभार सोडण्यास टाळाटाळ करत असतील, तर त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करणे आवश्यक आहे. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून हे गौडबंगाल चव्हाट्यावर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.