• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • We Will Fulfill The Common Mans Dream Of Housing And Bring Back Marathi People Who Have Left Mumbai

Eknath Shinde : सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. नेमकं काय म्हणाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2025 | 06:56 PM
मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार (फोटो सौजन्य-X)

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. मुंबईसाठी सर्वाधिक काम महायुती सरकारच्या काळात झालंय. ही कामं मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात आहे.

मध्य रेल्वेवर गणपती विशेष गाड्यांची घोषणा, मात्र तासाभरातच प्रवाशांना मोठा धक्का…

वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम आम्ही करीत आहोत. यामध्ये मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीपी नगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर इथल्या समुह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ २०१० रहिवाशांना होणार आहे त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. वरळी नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये एकूण १५ हजार ६०० भाडेकरूंचे पुनर्वसन होणार आहे. त्यापैकी वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार आहोत. एकूण सदनिकांपैकी २५ टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे.रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करतोय. या भागातून जाणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येतंय. पहिल्या टप्प्यात ६१४४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होत असून एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी हौसिंग स्टॉक वाढवणार

गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासासाठी मोठा त्याग केला आहे. आम्ही गिरणी कामगारांना मुंबईलगत घरे बांधून देणार आहोत. मुंबईबाहेर गेलेल्या गिरणी कामगारांना मुंबईत आणतोय. गिरणी कामगारांचे सर्वेक्षण करण्यासाठी अॅप तयार केले. मुंबईतल्या आजारी, बंद पडलेल्या गिरण्यांमधल्या १ लाख ७४ हजार १७२ गिरणी कामगारांची नोंद झाली.यापैकी २८ गिरण्यांच्या जागांवर बांधकाम पूर्ण करून घरांच्या सोडती चार टप्प्यात म्हाडाकडून काढण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत १३ हजार १६१ गिरणी कामगारांना घरं दिली आहेत.एमएमआरमध्ये अंदाजे एक लाख इतकी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी निर्णय घेतला आहे.एकूण सात जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचं ठरवले आहे. गिरणी कामगारांना परवडणारी घरे योजनेतून घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी हौसिंग स्टॉकही वाढवला जाईल. त्यासाठी नियमात बदलही केले जातील,अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

धारावीचा पुनर्विकास ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धारावीचा पुनर्विकास हे आमचे वचन आहे. या पुनर्विकासामुळे मुंबईचे नाही तर, देशाचं नाव जगात मोठं होईल. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर जगातला सर्वात मोठा पुनर्विकासाचा गृहनिर्माण प्रकल्प अशी ओळख होणार आहे. या प्रकल्पामुळे धारावीकरांचं जीवनच बदलून जाणार आहे.आम्ही धारावीतल्या प्रत्येकाचं पुनर्वसन करणार आहोत. एकूण ७२ हजार कुटुंबांचं पुनर्वसन होणार आहे. हा पुनर्विकास फक्त पायाभूत सुविधांचा नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सलोख्याचं मॉडेल ठरेल. हे ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेनं उचललेलं ऐतिहासिक पाऊल आहे.

परवडणारी ३५ लाख घरे बांधणार

परवडणाऱ्या घरांसाठी नवीन गृहनिर्माण धोरण तयार केले असून ७० हजार कोटींची गुंतवणूक करून ३५ लाख घरे बांधणार आहोत. सर्वसामान्यांना हक्काची परवडणारी, पर्यावरणपूरक घरे मिळणार आहेत. मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही खूप मोठा आहे. मुख्यमंत्री असताना बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये (अधिनियम 1976) सुधारणा केल्या आणि त्यामुळे आता अर्धवट सोडलेले प्रकल्प झपाट्याने पूर्ण करता येणार आहेत. रखडलेल्या ‘एसआरए’च्या योजना सरकारी संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होऊन ४० लाख झोपडपट्टीवासियांना घरे देण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने झोन निहाय समर्पित एजन्सी नेमून खड्डे तक्रारीवर कार्यवाही केली जात आहे. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी जेवढा खर्च लागतो तो यावर्षी ५० टक्क्यांनी कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल त्याचबरोबर तपासणीसाठी मुंबई आयआयटी सोबत करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला दवाखान्यासाठी ११०६ कोटी रुपये

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी पुढील चार वर्षांसाठी ११०६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि अद्ययावत चाचण्या या दवाखान्यामध्ये केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसह राज्याच्या विकासाच्या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Web Title: We will fulfill the common mans dream of housing and bring back marathi people who have left mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande  यांचा विशेष सन्मान!
1

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande यांचा विशेष सन्मान!

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना
2

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!
3

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव
4

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
यंदाच्या Diwali 2025 मध्ये ‘या’ 5 सरकारी बँक देताय आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Car Loan

यंदाच्या Diwali 2025 मध्ये ‘या’ 5 सरकारी बँक देताय आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Car Loan

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान, वेळीच करा सवयींमध्ये बदल

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान, वेळीच करा सवयींमध्ये बदल

झोप अपूर्ण होत असेल तर शरीर देतं हे संकेत ; आजच टाळा या गोष्टी अन्यथा होतील गंभीर परिणाम

झोप अपूर्ण होत असेल तर शरीर देतं हे संकेत ; आजच टाळा या गोष्टी अन्यथा होतील गंभीर परिणाम

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

व्हिडिओ

पुढे बघा
Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार शुभारंभ; विविध क्षेत्रांतील ‘इन्फ्लुएन्सर्स’चा गौरव

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार शुभारंभ; विविध क्षेत्रांतील ‘इन्फ्लुएन्सर्स’चा गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.