Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण मुंबईतील २० लाख रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १३,८०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार; म्हाडाचा मोठा निर्णय

खासगी कंपनीच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त जारी असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 07, 2026 | 04:12 PM
दक्षिण मुंबईतील २० लाख रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १३,८०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार (Photo Credit- X)

दक्षिण मुंबईतील २० लाख रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १३,८०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • दक्षिण मुंबईतील २० लाख रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी!
  • १३,८०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
  • म्हाडाचा मोठा निर्णय
MHADA Building Inspection: दक्षिण मुंबईतील अतिधोकायदायक इमारतींचा शोध घेऊन त्यांचा पुनर्विकास तातडीने मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या (MHADA) मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने १३ हजार ८०० उपकरप्राप्त इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त जारी असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. निविदा अंतिम करून या कामासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर इमारतींच्या तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे दुरुस्ती मंडळाचे नियोजन आहे.

६६० हून अधिक इमारतींची तपासणी पूर्ण

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर असून १३ हजार ८०० इमारतीमध्ये अंदाजे २० लाख रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी मंडळाने गेल्या वर्षी १३ हजार ८०० इमारतीची टप्प्याटप्प्याने संरचनात्मक तपासणी करून अतिधोकादायक इमारती शोधून काढण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्यात एक हजार इमारतीच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार ६६० हून अधिक इमारतींची तपासणी दुरुस्ती मंडळाने पूर्ण केली. यापैकी अंदाजे ९५ इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या.

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?

संरचनात्मक तपासणी कंपनीकडून करून घेणार

या कारवाईमुळे अतिधोकादायक आढळणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने मार्गी लागेल असे वाटत असतानाच उच्च न्यायालयाने मंडळाची ७९ (अ) ची प्रक्रिया बेकायदा ठरवली, त्यामुळे ही प्रक्रियाच ठप्प झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला म्हाडाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर पुनर्विकास ठप्प झाला आहे. आता मंडळाने इमारतीची संरचनात्मक तपासणी याच क्षेत्रातील कंपनीकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत करण्यात आलेली तपासणी ही मंडळाकडून अंतर्गत स्तरावर केली जात होती, पण आता मात्र या क्षेत्रातील कंपनीकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Important news for 2 million residents of south mumbai structural audits will be conducted on 13800 buildings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • mhada
  • Mumbai News

संबंधित बातम्या

महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?
1

महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?

मोठी बातमी ! राज्यात तब्बल 29 लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविनाच; 31 जानेवारीपर्यंत…
2

मोठी बातमी ! राज्यात तब्बल 29 लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविनाच; 31 जानेवारीपर्यंत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.