नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी बातमी, या तारखेपासून १५ शहरांमध्ये उड्डाणे
अब्जाधीश गौतम अदानी यांनी विकसित केलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) उड्डाण भरणारी इंडिगो पहिली एअरलाइन बनणार आहे. इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यामध्ये उड्डाणासंदर्भात करार झाला आहे. पहिल्या दिवसापासून १५ हून अधिक शहरांमध्ये १८ दैनंदिन उड्डाणे (३६ एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू करण्यात येणार आहेत.
चेन्नई विमानतळावर टळली मोठी दुर्घटना; थोडक्यात बचावले १८० प्रवासी, लँडिंगवेळी नक्की काय घडलं?
नोव्हेंबर ‘२५ पर्यंत १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ही संख्या ७९ दैनंदिन पर्यंत वाढवली जाईल आणि मार्च ‘२६ पर्यंत १०० हून अधिक दैनंदिन उड्डाणांपर्यंत (२०० एटीएम) वाढवली जाईल. नोव्हेंबर ‘२६ पर्यंत, १४० दैनंदिन उड्डाणे (२८० एटीएम) वाढवली जातील, ज्यामध्ये ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे..
भारतातील पीपीपी विमानतळांचे सर्वात मोठे ऑपरेटर इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (AAHL) व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा करून उद्योगातील पहिला टप्पा गाठला आहे. ही भागीदारी देशातील विमान वाहतूक वाढीला चालना देईल, ज्यामुळे २०३० पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक अर्थव्यवस्था बनण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल असेल, असं एअरलाइनने एका निवेदनात म्हटलं आहे.
“दोन्ही कंपन्यांमधील करार पूर्ण ऑपरेशनल तयारी साध्य करण्याचे संकेत देते. प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भारताच्या भरभराटीच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला आणखी हातभार लावण्यासाठी हा विस्तार करण्यात येत आहे. अगदी नवीन NMIA कडून येणाऱ्या नवीन उड्डाणांमुळे आमच्या ग्राहकांचा प्रवास अनुभव वाढेल आणि आमच्या अतुलनीय नेटवर्कवर परवडणाऱ्या, वेळेवर त्रासमुक्त सेवांचा आनंद घेता येईल,” असं इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी म्हटलं आहे.
AAHL चे सीईओ अरुण बन्सल म्हणाले, ही भागीदारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ट्रान्सफर हब म्हणून NMIA चे स्थान निश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. “एकत्रितपणे, आम्ही लाखो प्रवाशांसाठी प्रवास अनुभव बदलण्यास सज्ज आहोत, त्यांना सुविधा आणि सुधारित प्रवास पर्याय दोन्ही प्रदान करू. आमचे सहकार्य या प्रदेशासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवाशांसाठी विमान वाहतुकीत NMIA ची भूमिका मजबूत करण्यासाठी सज्ज आहे.”
अदानी समूहाचे २.१ अब्ज डॉलर्समधून उभारण्यात आलेले नवीन विमानतळ हा २.१ दशलक्ष लोकसंख्येच्या या विस्तीर्ण महानगरासाठी एक ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. विमान वाहतुकीतील अडथळे कमी करणे आणि दुबई, लंडन किंवा सिंगापूरसारखे आंतरराष्ट्रीय वाहतूक केंद्र निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी नवीन विमानतळाभोवती “एअरो सिटी” बांधण्याची योजना आखली आहे. जेणेकरून उत्पन्नाचे गैर-विमानचालन स्रोत वाढतील.विद्यमान मुंबई विमानतळ आणि शहराच्या बाहेरील नवीन विमानतळ दोन्ही अदानी समूहाद्वारे व्यवस्थापित केले जातात, ज्यामुळे भारतीय बंदर-ते-शक्ती समूह मजबूत स्थितीत आहे.
Nitin Gadkari Birthday: देशातील रस्त्यांचे जाळे वाढवणारा एकमेव नेता, Top 3 मध्ये समाविष्ट केला भारत
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कमळाच्या आकाराच्या इमारतीसह नवीन विमानतळ सुरुवातीला २० दशलक्ष प्रवाशांच्या वार्षिक क्षमतेसह एक टर्मिनल चालवणार आहे. मागणी वाढली तर पुढील दशकात ९० दशलक्ष प्रवाशांसाठी टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवण्यात येणार आहे. काही विमान कंपन्यांना एप्रिल ते जून दरम्यान देशांतर्गत कामकाजासाठी शिफ्ट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि ऑगस्टमध्ये विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची अपेक्षा आहे, असं अहवालात म्हटलं आहे.