Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Children Day Celebration : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालस्वप्नांचा आनंदोत्सव; जवाहर बाल भवनात बालदिन उत्साहात साजरा!

Children Day Celebration : मुंबईतील चर्नी रोड येथील जवाहर बाल भवनात बालदिनानिमित्त बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला, रंगभरण, कुचीपुडी, भरतनाट्यम, कथक, गीतगायन आणि बालनाट्यातून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे दर्शन घडवले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 15, 2026 | 06:30 PM
Children Day Celebration : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालस्वप्नांचा आनंदोत्सव; जवाहर बाल भवनात बालदिन उत्साहात साजरा!

Children Day Celebration : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालस्वप्नांचा आनंदोत्सव; जवाहर बाल भवनात बालदिन उत्साहात साजरा!

Follow Us
Follow Us:
  • चित्रकला, रंगभरण, शास्त्रीय नृत्याचे आयोजन
  • बालप्रतिभेचा बहारदार आविष्कार
  • एकपात्री अभिनयातून कौशल्याची छाप
 

नीता परब, मुंबई

 

Children Day Celebration : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई यांच्या वतीने बालोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. बालकांवर विशेष प्रेम करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून बालभवनाची निर्मिती झाली.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेले चर्नी रोड येथील समुद्रकिनारी वसलेले जवाहर बाल भवन हे भारतातील पहिले बालभवन म्हणून विशेष ओळखले जाते. याच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वास्तूत बालदिनाचा सोहळा बालप्रतिभेच्या विविध रंगांनी मोठ्या उत्साहात रंगला.

कलात्मक दृष्टीकोनाचा मनोहारी आविष्कार

बालोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध कलास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरी आणि इयत्ता तिसरी ते चौथी अशा दोन गटांत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या गटांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगांच्या माध्यमातून कल्पनांचे सुंदर विश्व कागदावर साकारले, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि कलात्मक दृष्टिकोन यांचा मनोहारी आविष्कार घडविला.

बालोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कुचीपुडी, भरतनाट्यम आणि कथक या शास्त्रीय नृत्यप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. ताल, लय, भावमुद्रा आणि पदन्यास यांचा सुरेख मिलाफ साधत बालकलावंतांनी भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचे देखणे दर्शन घडविले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा

एकपात्री अभिनयातून कौशल्याची छाप

संगीत आणि अभिनयाच्या क्षेत्रातही विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिभेची सुंदर झलक दाखवली. सुमधुर गीतगायनातून त्यांनी स्वरांची सुरेल मैफल सजवली. सुरेल आवाज, गाण्यातील भावपूर्णता आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
तसेच एकपात्री अभिनयाच्या सादरीकरणातून विद्यार्थिनींनी आपल्या अभिनयकौशल्याची प्रभावी छाप उमटवली. विविध भावछटा, संवादफेक, हावभाव आणि देहबोली यांच्या माध्यमातून त्यांनी रंगमंचावर जणू एक स्वतंत्र भावविश्वच उभे केले. लहान वयातच एवढ्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने व्यक्त होणाऱ्या या बालकलावंतांचे विशेष कौतुक करण्यात आले.

याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालनाट्य प्रवेशांनी कार्यक्रमात नाट्यमय रंगत आणली. निरागसता, कल्पकता आणि सहज अभिनय यांचा सुंदर संगम त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. रंगभूमीवरील वावर, संवादफेक आणि प्रसंगानुरूप अभिनय यांतून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या नाट्यकलेचे दर्शन घडविले. या छोट्या कलावंतांच्या सादरीकरणातून उद्याच्या रंगभूमीची आश्वासक पावले उमटताना दिसली.

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

नीता पाटील यांचे पालकांना मार्गदर्शन

याप्रसंगी बालभवनच्या संचालिका नीता पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन करताना आपल्या पाल्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे, त्यांच्या आवडी-निवडींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि अशा सर्जनशील उपक्रमांमध्ये मुलांना सातत्याने सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सृजनी यमुनुरवार यांनी केले. हा बालोत्सव यशस्वी करण्यासाठी आसिफ शेख, योगेश कामडी, विशाल ठाकूर, रुपाली पालेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बालोत्सवाच्या माध्यमातून मुलांना केवळ आपली कला सादर करण्याची संधी मिळाली नाही, तर स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास, सहकाऱ्यांसोबत काम करण्याची वृत्ती आणि कलेविषयीची आस्था यांचीही सुंदर शिदोरी मिळाली. रंग, रेषा, स्वर, ताल, लय आणि अभिनय अशा विविध कलांच्या माध्यमातून बालमनातील कल्पनाशक्तीला मिळालेले मुक्त व्यासपीठ म्हणजे हा बालोत्सव ठरला. बालकांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, सादरीकरणातील उत्साह आणि पालकांच्या चेहऱ्यावरील अभिमान यामुळे चर्नी रोडवरील जवाहर बाल भवनाचा परिसर खऱ्या अर्थाने बालप्रतिभेच्या आनंदाने आणि उत्साहाने फुलून गेला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जवाहर बाल भवनात बालोत्सवाचे आयोजन कशानिमित्त करण्यात आले होते?

    Ans: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

  • Que: जवाहर बाल भवन कुठे आहे?

    Ans: महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन हे मुंबईतील चर्नी रोड येथे समुद्रकिनारी वसलेले आहे.

  • Que: बालोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश काय होता?

    Ans: मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि सर्वांगीण विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या बालोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.

Web Title: Jawahar bal bhavan mumbai children day celebration balotsav 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • children story
  • Pandit nehru
  • Student

संबंधित बातम्या

AI in Education: अभ्यास करताना  AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम
1

AI in Education: अभ्यास करताना AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

Children’s Day 2026: १४ नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि चाचा नेहरू यांच्याशी संबंधित खास गोष्ट
2

Children’s Day 2026: १४ नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि चाचा नेहरू यांच्याशी संबंधित खास गोष्ट

Children’s Day Wishes: मुलं म्हणजे पाखरांची चपळता…! बालदिनानिमित्त मुलांना द्या गोड आणि प्रेमळ शुभेच्छा
3

Children’s Day Wishes: मुलं म्हणजे पाखरांची चपळता…! बालदिनानिमित्त मुलांना द्या गोड आणि प्रेमळ शुभेच्छा

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
4

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.