Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI in Education: अभ्यास करताना AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

AI in Education: विद्यार्थ्यांकडून अभ्यासात चॅटजीपीटीसारख्या AI टूल्सचा वापर वाढला आहे. गृहपाठ कॉपी करणे आणि AI वर अतिअवलंबित्व यामुळे विचार करण्याची क्षमता कशी कमी होते आणि AI चा योग्य वापर कसा करावा, ते जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 15, 2026 | 12:24 PM
education

education

Follow Us
Follow Us:

AI in Education: आजच्या काळात अभ्यासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वेगाने वाढत आहे. चॅटजीपीटीसारख्या टूल्सच्या मदतीने विद्यार्थी काही सेकंदांमध्ये कठीण प्रश्नांची उत्तरे शोधून काढतात. यामुळे वेळ नक्कीच वाचतो, पण अनेक विद्यार्थी याचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. ते प्रश्न न समजताच AI कडून संपूर्ण गृहपाठ आणि प्रोजेक्ट तयार करून घेतात आणि तो आपल्या वहीत उतरवतात. सुरुवातीला हा मार्ग सोपा वाटतो, पण हळूहळू याचा परिणाम त्यांच्या विचार करण्याच्या, लिहिण्याच्या आणि स्वतःहून प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेवर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी AI चा वापर करताना काही चुका टाळल्या पाहिजेत.

न समजता AI ची उत्तरे कॉपी करणे ही मोठी चूक

अनेक विद्यार्थी गृहपाठ मिळताच प्रश्न थेट AI टूलमध्ये टाकतात. त्यानंतर जे उत्तर मिळते, ते न वाचता आणि न समजताच आपल्या वहीत लिहून काढतात. असे केल्याने त्यांना प्रश्न सोडवण्याची पद्धत समजत नाही. परीक्षेच्या वेळी जेव्हा असाच प्रश्न स्वतः सोडवावा लागतो, तेव्हा ते गोंधळून जातात. वारंवार असे केल्याने स्वतःहून लिहिण्याची आणि उत्तर तयार करण्याची सवयसुद्धा कमजोर होते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हुबेहूब कॉपी करण्यापेक्षा आधी तो प्रश्न समजून घेणे आणि आपल्या स्वतःच्या शब्दांत लिहीणे गरजेचे आहे.

एम्सने जाहीर केला INI CET चा निकाल; ३४ हजारांहून अधिक उमेदवार यशस्वी, असा करा चेक

प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी AI वर अवलंबून राहू नका

काही विद्यार्थी छोट्या-छोट्या प्रश्नांसाठी आणि सामान्य माहितीसाठीसुद्धा AI ची मदत घेऊ लागतात. यामुळे स्वतः विचार करण्याची आणि उत्तरे शोधण्याची त्यांची सवय कमी होते. याशिवाय, AI नेहमीच बरोबर माहिती देईल असे नाही. अनेकदा ते चुकीच्या तारखा, आकडे, नावे किंवा गणिताचे चुकीचे फॉर्म्युलेही सांगून टाकते. जर विद्यार्थ्यांनी व्हेरीफाय न करता अशी माहिती पाठ केली, तर परीक्षेत चुकीचे उत्तर लिहिण्याची शक्यता वाढते. त्यामुळे AI कडून मिळालेली माहिती पुस्तके, नोट्स आणि विश्वासार्ह स्रोतांकडून नक्की तपासली पाहिजे.

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर

AI चा वापर शिक्षकासारखा करा, नक्कल करण्यासाठी नाही

AI चा योग्य वापर म्हणजे अभ्यास सोपा करणे. जर एखाद्या विषयाची संकल्पना समजली नाही, तर ती सोप्या भाषेत समजवून सांगण्यास AI ला सांगा. एखादा प्रश्न सोडवण्यासाठी सरळ संपूर्ण उत्तर मागण्याऐवजी स्टेप बाय स्टेप पद्धत विचारा. सर्वात आधी प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जिथे अडचण येईल, तिथेच AI ची मदत घ्या. त्यानंतर मिळालेल्या उत्तराची तुमच्या पुस्तकांशी आणि नोट्सशी खात्री करा. लक्षात ठेवा, AI तुमच्या अभ्यासात मदत करू शकतो, पण शिकण्याची आणि समजून घेण्याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थ्यांनी अभ्यासात AI चा वापर कसा केला पाहिजे?

    Ans: विद्यार्थ्यांनी AI चा वापर केवळ उत्तर कॉपी करण्यासाठी न करता, कठीण संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी किंवा एखाਦਾ प्रश्न सोडवण्याची 'स्टेप बाय स्टेप' पद्धत शिकण्यासाठी शिक्षकासारखा केला पाहिजे

  • Que: गृहपाठासाठी थेट AI ची उत्तरे कॉपी केल्याने काय नुकसान होते?

    Ans: थेट उत्तरे कॉपी केल्यामुळे प्रश्न सोडवण्याची पद्धत समजत नाही, स्वतःहून विचार करण्याची सवय कमजोर होते आणि परीक्षेच्या वेळी स्वतःहून उत्तर लिहिताना अडचण निर्माण होते.

  • Que: AI कडून मिळालेली माहिती नेहमीच अचूक असते का?

    Ans: नाही, AI नेहमीच बरोबर माहिती देईल असे नाही. अनेकदा त्यात चुकीच्या तारखा, आकडे किंवा नावे असू शकतात; त्यामुळे मिळालेली माहिती पुस्तके किंवा विश्वासाह्य स्रोतांकडून तपासून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Impact of ai on student studies and how to use it correctly sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • ai
  • education
  • Student

संबंधित बातम्या

JEE Advanced 2027 परीक्षेची तारीख जाहीर! पेपरला जाण्यापूर्वी ‘या’ नियम आणि अटी एकदा वाचाचं
1

JEE Advanced 2027 परीक्षेची तारीख जाहीर! पेपरला जाण्यापूर्वी ‘या’ नियम आणि अटी एकदा वाचाचं

AI Revolution in Healthcare : कर्करोग, अल्झायमर होणार इतिहासजमा? एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता
2

AI Revolution in Healthcare : कर्करोग, अल्झायमर होणार इतिहासजमा? एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी
3

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी

Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या
4

Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.