Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विविध कागदपत्रांची छाननी आणि संशयित नियुक्त्यांची पडताळणी केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 08:04 AM
राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात

राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये १५० शिक्षकांच्या मान्यता रद्द
  • बीड, लातूरमध्येही कारवाईचे पडसाद
  • नागपूरमध्ये ६३२ कर्मचाऱ्यांचे वेतन व नियुक्त्यांचा प्रश्न
मुंबई : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी आता शिक्षण विभागाने प्रशासकीय कारवाई सुरू केली आहे. संशयित शिक्षकांचे वेतन रोखणे, वैयक्तिक मान्यता रद्द करणे आणि नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे बोगस नियुक्त्यांद्वारे शासकीय वेतनाचा लाभघेणाऱ्यांवरील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विविध कागदपत्रांची छाननी आणि संशयित नियुक्त्यांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात १५० शिक्षकांच्या मान्यता रद्द करून त्यांचे वेतन थांबवण्यात आल्याची माहिती आहे. विभागातील एकूण ८९३ संशयास्पद प्रकरणांची छाननी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही १३२ जणांच्या मान्यता रद्द करून वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना ! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये

या कारवाईमुळे शिक्षक भरती प्रक्रिया, वैयक्तिक मान्यता आणि वेतन वितरणातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बनावट कागदपत्रे किंवा नियमबाह्य मान्यता सिद्ध झाल्यास शिक्षकांबरोबरच संबंधित संस्थाचालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे नाशिकमधील ८९३ प्रकरणांच्या छाननीतून कोणती माहिती समोर येते आणि शिक्षण विभाग पुढे कोणती पावले उचलतो, याकडे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

FAQ

प्रश्न 1: शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे काय?

उत्तर: शालार्थ प्रणालीतील आयडी आणि त्यासंबंधित शिक्षकांच्या नियुक्ती किंवा वेतन नोंदींमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या प्रकरणाला शालार्थ आयडी घोटाळा असे म्हटले जाते.

प्रश्न 2: शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात का आल्या आहेत?

उत्तर: कथित अनियमित नियुक्त्या किंवा संशयास्पद नोंदींची पडताळणी सुरू असल्यास संबंधित शिक्षकांच्या नियुक्तीच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. मात्र, प्रत्येक शिक्षकाची परिस्थिती स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.

प्रश्न 3: शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षकांचे पगार रोखले जाऊ शकतात का?

उत्तर: संबंधित प्रकरणातील चौकशी, उपलब्ध पुरावे आणि लागू नियमांनुसार वेतनाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रत्यक्ष कारवाईसाठी अधिकृत आदेश तपासणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Jobs of many teachers at risk moves underway to withhold salaries and revoke recognition nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Shalarth ID

संबंधित बातम्या

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी
1

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार थेट 2 हजार रुपये, कधी ते जाणून घ्या…
2

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार थेट 2 हजार रुपये, कधी ते जाणून घ्या…

अधिस्वीकृत संपादक अन् पत्रकार महासभेच्या राज्याध्यक्षपदी निलेश भिलारे; सचिवपदी अशोक इथापे
3

अधिस्वीकृत संपादक अन् पत्रकार महासभेच्या राज्याध्यक्षपदी निलेश भिलारे; सचिवपदी अशोक इथापे

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
4

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.