
Nilesh Bhilare, Ashok Ithape
महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती प्राप्त असलेल्या संपादक व पत्रकारांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यावसायिक हक्कांचे संरक्षण करणे, पत्रकारितेचा सन्मान व स्वाभिमान जपणे आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, हा महासभेच्या कार्याचा प्रमुख उद्देश आहे. ‘महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि हित जपणारी राज्यव्यापी संघटनात्मक शक्ती!’ हे ध्येय समोर ठेवून महासभेच्या माध्यमातून पत्रकारांचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
Navdurga Gaurav Award 2026 : कवठे गावातील १६ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा गौरव पुरस्काराने’ सन्मान
यासंदर्भात अध्यक्ष श्री. निलेश भिलारे म्हणाले, “महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी ‘अधिस्वीकृत संपादक व पत्रकार महासभा, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने कार्य करण्याचा आमचा संकल्प आहे. पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांचे व्यावसायिक हक्क आणि हितसंबंध यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, तसेच पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, निर्भीडता आणि विश्वासार्हता जपणे, याला आमचे प्राधान्य राहील. राज्यातील अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांनी या संघटनात्मक प्रवासात सहभागी होऊन एकजूट बळकट करावी. पत्रकारांच्या सन्मानासाठी, हक्कांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महासभा सदैव कटिबद्ध राहील.”
अध्यक्ष श्री. निलेश भिलारे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संघटनात्मक कार्य राज्यभर विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे. पत्रकारांच्या अडचणी, व्यावसायिक समस्या आणि शासकीय स्तरावरील प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे, पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबविणे आणि पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे जतन करणे, यासाठी महासभा प्रयत्नशील राहणार आहे.
सचिव श्री. अशोक इथापे म्हणाले, “अध्यक्ष श्री. निलेश भिलारे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल निश्चितच प्रगतीच्या आणि यशाच्या शिखराकडे होईल. अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांच्या हक्कांसाठी सक्षम व्यासपीठ उभारणे ही काळाची गरज आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या जातील. पत्रकारितेचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि व्यावसायिक हितांचे रक्षण केले जाईल. सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी सहभागी होऊन संघटनेची ताकद वाढवावी.”
पत्रकारितेचा सन्मान, पत्रकारांचा स्वाभिमान आणि पत्रकारांच्या हिताचे संरक्षण या त्रिसूत्रीवर आधारित कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांसाठी एक सक्षम आणि प्रभावी व्यासपीठ उभारण्याचा संकल्प महासभेने केला आहे.
“लवकरच महाराष्ट्रातील विभागीय तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार आहेत. या निवडींच्या माध्यमातून संघटनेचा राज्यव्यापी विस्तार साधून कार्यकारिणी अधिक सक्षम, व्यापक आणि प्रभावी करण्यात येईल. महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक सर्व संपादक व पत्रकारांनी ‘अधिस्विकृत संपादक व पत्रकार महासभा, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेशी जोडले जाऊन सभासदत्व स्वीकारावे आणि पत्रकारांचे हक्क, सन्मान व हित जपण्याच्या या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.”