Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आल्याचा दावा आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 26, 2026 | 08:08 PM
jarange patil audio clip

jarange patil audio clip

Follow Us
Follow Us:
  • 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी SIT स्थापन
  • शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली तपास
  • शिंदे-फडणवीसांबाबत जरांगेंनी उपस्थित केले प्रश्न
 

Manoj Jarange Audio Clip Row : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून जोरदार चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या या क्लिपमधील दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकाचं नेतृत्व अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे करणार आहेत.

या तपास पथकात पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांचा समावेश आहे. कथित ऑडिओ क्लिपची सत्यता, त्यातील आवाजांची ओळख आणि त्यामध्ये उल्लेखलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत तपास केला जाणार आहे. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख आहे.

‘छक्के-पंजे खेळू नका’; जरांगेंचा सवाल

SIT स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी चौकशीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले. केवळ तपास पथक स्थापन करून चालणार नाही, तर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणलं पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

जरांगेंनी ही ऑडिओ क्लिप AI च्या मदतीने तयार केलेली नसून खरी असल्याचा दावा केला आहे. मात्र, क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही. त्यामुळे फॉरेन्सिक तपासाला या प्रकरणात विशेष महत्त्व असणार आहे.

जरांगेंनी शिंदे आणि फडणवीस यांच्यातील कथित राजकीय तणावाचाही उल्लेख करत, या प्रकरणामागे कोणाचा हेतू होता, असा सवाल उपस्थित केला.

संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र

दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ऑडिओ क्लिप बनावट किंवा AI-निर्मित असल्याची शक्यताही राजकीय नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता SIT च्या तपासातून क्लिपमधील आवाज, कथित व्यवहार आणि संपूर्ण प्रकरणामागील सत्य स्पष्ट होणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी SIT चे प्रमुख कोण आहेत?

    Ans: अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि बजरंग बनसोडे हे या पथकाचे सदस्य आहेत.

  • Que: मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिपबाबत काय दावा केला?

    Ans: जरांगे यांनी क्लिप खरी असल्याचा दावा केला असून, तिची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • Que: संजय राऊत यांनी या प्रकरणात काय मागणी केली?

    Ans: संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कथित आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणात ED चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Manoj jarange audio clip row 500 crore audio clip sit probe maharashtra vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘भिकाऱ्यासारखं दारात उभं राहू नका’; अर्थमंत्रीपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा अजित पवार गटाला टोला!
1

Sanjay Raut : ‘भिकाऱ्यासारखं दारात उभं राहू नका’; अर्थमंत्रीपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा अजित पवार गटाला टोला!

Satej Patil News:अल निनोचे कारण सांगता अन् निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणता; सतेज पाटलांचा पलटवार
2

Satej Patil News:अल निनोचे कारण सांगता अन् निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणता; सतेज पाटलांचा पलटवार

Manoj Jarange Patil: 500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले…
3

Manoj Jarange Patil: 500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले…

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:मध्य रेल्वेची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी उशिराने
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:मध्य रेल्वेची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी उशिराने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.