उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार यषथील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तिक मान्यता व शालेय प्रस्ताव नसताना मागील तारखेच्या नियुक्त्या दाखविण्यात आल्या होत्या.
अनेक शाळा कर्मचाऱ्यांकडून अद्यापही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने वेतन प्रक्रिया अडचणीत येत असून, यावर वेळेत नियोजन करणे अत्यावश्यक ठरले आहे.
शालार्थ प्रणालीतील गैरव्यवहाराची चौकशी करून सादरीकरणासाठी अहवाल 'एसआयटी'ला आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.