Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची…”; Mangal Prabhat Lodha यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

कामं सुरू असलेल्या रस्त्यांवर सकाळी आठ वाजे पासून ते १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही मंत्री लोढा यांनी यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 06:20 PM
“गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची…”; Mangal Prabhat Lodha यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
Follow Us
Follow Us:

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू
मंगलप्रभात लोढा यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी खबरदारी

मुंबई: गिरगावातली प्रसिद्ध हिंदु नववर्ष गुढीपाडव्याची शोभायात्रा विनासायास आणि उत्साहात पार पाडावी याची जोरदार तयारी सुरू असून या अनुषंगाने तिथल्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाहणी केली. गुढीपाडव्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याने कामाचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातले सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल रोड आणि जगन्नाथ शंकरशेट रोड तसेच खेतवाडी आणि प्रार्थना समाज या भागात जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. गुढी पाडव्याच्या शोभायात्रेच्या या मार्गांवर कामं सुरू असल्याने शोभायात्रेत अडचण येण्याची शक्यता असल्याने मंत्री लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा घेतला.

कामं सुरू असलेल्या रस्त्यांवर सकाळी आठ वाजे पासून ते १० वाजे पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच पाडव्याच्या आधी म्हणजेच १७ मार्च पूर्वी कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करून रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याचे आदेश यावेळी मंत्री लोढा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांना तात्काळ हटवण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले.

नवं वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने नियोजित गिरगावची प्रसिद्ध शोभायात्रा सुरळीत पार पडावी या अनुषंगाने व्ही. पी. मार्ग आणि जे. एस. एस. रोड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामांची आज पाहणी करून आढावा घेतला. रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित… pic.twitter.com/G1XotLMjWZ — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) March 10, 2026

शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण न होता वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही निर्देश मंत्री लोढा यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत. गिरगावची गुढीपाडवा शोभायात्रा ही हिंदू नववर्षाच्या स्वागताचा एक भव्य, पारंपरिक आणि उत्साही सोहळा आहे. या यात्रेत ढोल-ताशांचा नाद, महिलांची बाईक रॅली, नऊवारी साडीतील रणरागिणी, आणि ऐतिहासिक विषयांवरील चित्ररथ आकर्षणाचे केंद्र असतात. दरवर्षी गुढीपाडव्याला पहाटेपासूनच गिरगावच्या रस्त्यांवर मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. अशा उत्सवात केवळ रस्त्यांच्या कामामुळे विरजण पडू नये ही आमची भूमिका असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Mangal prabhat lodha instructs to officers complete the road works in girgaum during gudi padwa 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Goregaon
  • Gudi Padwa
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

‘… तर विकासकांना थेट जेलमध्ये टाका’; Mhada ची घरे अडवणाऱ्यांना Mangal Prabhat Lodha यांचा इशारा
3

‘… तर विकासकांना थेट जेलमध्ये टाका’; Mhada ची घरे अडवणाऱ्यांना Mangal Prabhat Lodha यांचा इशारा

राज्यातील तरुणांसाठी खूशखबर! वर्षभरात १,००० रोजगार मेळावे आयोजित करणार; मंत्री मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा
4

राज्यातील तरुणांसाठी खूशखबर! वर्षभरात १,००० रोजगार मेळावे आयोजित करणार; मंत्री मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.