Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मुंबईकरांची होणार कोंडी! CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 01, 2025 | 08:53 AM
मुंबईकरांची होणार कोंडी! CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

मुंबईकरांची होणार कोंडी! CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

Manoj Jarange Patil Mumbai Morcha News in Marathi :मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो आंदोलक आता मुंबईकडे रवाना होत आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सीएसएमटी स्टेशनकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आझाद मैदानाबाहेरील महत्त्वाचे मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत हे आंदोलन महत्त्वाचे मानले जाते. आंदोलकांची वाढती संख्या आणि वाहतुकीतील बदलांमुळे मुंबईकरांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

वाहतुकीत नेमके कोणते बदल?

  • मुंबई सीएसएमटी आणि पालिकाकडे जाणारे सर्व मार्ग आज वाहतुकीसाठी बंद राहतील.
  • जेजे उड्डाणपुला मार्गाने मुंबईकडे येणारी वाहने मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्टेशनमार्गे मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या मार्गावर वळवली जातील.
  • तर मेट्रो जंक्शनपासून ते सीएसएमटीकडे जाणारा आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका रस्ता बंद राहील.
  • फॅशन स्ट्रीट, सीएसएमटीकडे जाणारा शिवाय हजारीमल सोमाणी रस्ता आणि आझाद मैदानला लगूनकडे जाणारा रस्ता बंद राहील.
  • शिवाय हुतात्मा चौकून सीएमएटकडे जाणारे वाहतूक मार्ग बदलण्यात आले आहेत.
  • तसेच मंत्रालयासमोरील मादाम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • वाहनांच्या वाहतुकीमुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी खुला राहील.
  • मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरातील वाहतुकीत बदल झाल्यामुळे, आझाद मैदान, मरीन ड्राइव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना फक्त अतिरिक्त मर्यादा देण्यात आली आहे.
  • वडाळा वाहतूक पोलीस ३५ आणि आझाद मैदान पोलिस ३५ आणि ७० जणांची अतिरिक्त माहिती कुमक किंवा दोन्ही वाहतूक पोलीस चौक्यांना देण्यात आली आहे.

मराठ्यांना OBC तून आरक्षण मिळणार की नाही? मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस स्पष्टच म्हणाले – ‘कायद्याच्या चौकटीत…’,

Web Title: Manoj jarange patil mumbai morcha azad maidan all roads leading to csmt closed big decision by mumbai police changes in many traffic routes in south mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी
3

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”,  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
4

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.