
date for the Mayor reservation draw has been announced by the Urban Development Department
राज्याच्या नगरविकास खात्याकडून महापौर पदाची सोडत जाहीर केली जाते. मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे महापौर आरक्षण सोडतीला उशीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार आहे. एकनाथ शिंदेंनी हिरवा कंदील दिल्यानंतर महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : राजकारणातून निवृत्तीचा निर्णय; “आता मला थांबायचंय” ! विधानसभा परिषद सदस्याचं भावनिक पत्र
सध्या नगरविकास खात्याचे एक पत्र समोर आले आहे. शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी 19 जानेवारी रोजी नगर विकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार, येत्या 22 जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मा. राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.२२.०१.२०२६ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११.०० वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर बाब राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना
राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक पालिकांमध्ये महापौर बसवण्यासाठी एका पक्षाने बहुमत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांचे अंकाचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरु झाले आहे. मुंबई महापालिकेबाबत देखील हीच परिस्थिती आहे महायुतीचा मुंबईमध्ये महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. . भाजपचा नेता महापौर बसवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यावरुन काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.