मनसेचा गुढीपाडवा मेळावा, 'या' रस्ते वाहतुकीत मोठे बदल (फोटो सौजन्य-X)
MNS Padwa Melava news in marathi: दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवार, ३० मार्च रोजी दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क येथे ‘पाडवा मेळावा’ आहे. वाहतूकीतील बदल रविवार, ३० मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे.
या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मनसेचे अनेक समर्थक आणि कार्यकर्ते त्यांच्या वाहनांसह शिवाजी पार्कला येण्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व दुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने येणार असल्याने विशेषतः कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन व्यवस्थापनासाठी आदेश देणे आवश्यक आहे. नागरिकांची तसेच व चालकांना होणारा अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
■ एस व्ही रोड (सिद्धिविनायक मंदिर
जंक्शन पासून येस बँक जंव पर्यंत).
■ केळुस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर), दादर.
■ एमबी राऊत मार्ग.
■ पांडुरंग नाईक मार्ग (रस्ता क. 5).
■ दादासाहेब रेगे मार्ग.
लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क
■ गेट क्र. 4 पासून शितलादेवी मंदिर जंक्शन
पर्यंत). ■ एनसी केळकर मार्ग (गडकरी जंक्शन ते
हनुमान मंदिर जंक्शन पर्यंत), दादर
सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बैंक जंक्शन पर्यंत एसव्हीएस रोड.
■ पर्यायी मार्ग: सिद्धिविनायक जंक्शन
ते एसके बोले रोड-आगर बाजार-पोर्तुगीज चर्च-डावीकडे वळण-गोखले रोड-एलजे रोड.
■ राजा बधे चौक जंक्शनपासून केळुस्कर रोड (उत्तर) जंक्शन, दादर पर्यंत.
■ पर्यायी मार्ग : एलजे रोड- गोखले रोड-स्टीलमन जंक्शन उजवीकडे वळण घेऊन एसव्ही एस.
■ दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पांडुरंग नाईक रोडव जंक्शनपासून लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग.
■पर्यायी मार्ग : राजावडे जंक्शनपासून एल. जे. रोडकडे.
गडकरी चौक जंक्शन ते केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर), दादर.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी एमबी राऊत मार्गाचा वापर करावा.