• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Harshvardhan Sapkal Has Questioned The Government Regarding Loan Waiver Nrdm

‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ कर्जमाफीवरुन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा संतप्त सवाल

‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2025 | 04:18 PM
‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ कर्जमाफीवरुन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा संतप्त सवाल

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण आजही लाडक्या बहिणींना १५०० रुपयेच दिले जात आहेत. उलट १० लाख बहिणींच्या नावांना कात्री लावत लाडकी बहिण योजनेतून बाद केले आहे. शेतकरी कर्जमाफीवर बजेटमध्ये एक शब्दही काढला नाही. ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी-शाह यांचे सतत गुणगाण गात असतात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पशेल पॅकेज घेऊन यावे, असेही सपकाळ म्हणाले.

मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग वाढला पण मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात या वर्गाचे कंबरडे मोडले आहे, लघू, छोटे व मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नाही तर जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला. उल्हासनगर सारख्या शहरातील या उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मुल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रीत करण्याचे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते पण भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उल्हास नगर, कल्याण डोंबिवलीला भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिब हटावची योजना राबवली, बांग्लादेशाची निर्मिती केली, बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तर राजीव गांधी यांनी पंचायत राज आणले, संगणक क्रांती आणली. डॉ. मनमोहनसिंह सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैसा कसा येईल यासाठी धोरणे आखली. प्रत्येक पंतप्रधानांनी काहीही ना काही योगदान दिले आहे पण आत्ताच्या पंतप्रधानांची ओळख खोटे बोलणारा, भांडणे लावणार अशी आहे. मोदींचा कारभार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’ असा आहे. आता आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई जीवन मरणाची आहे, ‘करो या मरो’ची आहे, त्यामुळे लढायची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

Web Title: Harshvardhan sapkal has questioned the government regarding loan waiver nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Congress
  • devendra fadanvis
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra

संबंधित बातम्या

St Bus : ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा
1

St Bus : ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

Thane News: “आमच्या अस्तित्वावरच घाला… कोपरीकरांचा संताप ओसंडून वाहिला”, विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!,
2

Thane News: “आमच्या अस्तित्वावरच घाला… कोपरीकरांचा संताप ओसंडून वाहिला”, विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!,

नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची काँग्रेसची मागणी
3

नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची काँग्रेसची मागणी

अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्या मुलाचा…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
4

अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्या मुलाचा…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लाडक्या बहिणींनो लक्ष द्या; अर्जांची होणार सूक्ष्म छाननी, मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या; अर्जांची होणार सूक्ष्म छाननी, मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

Hartalika 2025: हरतालिकेच्या पूजेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा? जाणून घ्या 

Hartalika 2025: हरतालिकेच्या पूजेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा? जाणून घ्या 

VI App वर गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट सुरु, ४९९९ रुपयांचे वार्षिक रिचार्ज जिंकण्याची संधी

VI App वर गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट सुरु, ४९९९ रुपयांचे वार्षिक रिचार्ज जिंकण्याची संधी

आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….! लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद

आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….! लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.