Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Supports Maratha Reservation Protest: रोज परप्रांतीयांची गर्दी सहन करतो..; मराठा आंदोलकांना मनसेचा पाठिंबा

आंदोलकांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी अडचण निर्माण होत असल्याचा दाखला देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2025 | 10:32 AM
MNS Supports Maratha Reservation Protest: रोज परप्रांतीयांची गर्दी सहन करतो..; मराठा आंदोलकांना मनसेचा पाठिंबा
Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर
  • उच्च न्यायालयाचा  आझाद मैदान रिकामे करण्याचा निर्देश
  • मराठा आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
MNS Supports Maratha Reservation Protest: गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सातत्याने सरकारविरोधात लढा देणारे मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा समुदायातील हजारो-लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होत असल्याने त्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर कोंडी निर्माण झाली असून, रेल्वे स्थानकांपासून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत आंदोलकांची गर्दी दिसून येत आहे.

Maratha Reservations: आझाद मैदान तातडीने रिकामे करा..; जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस

दरम्यान, आंदोलकांकडून विविध सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली जात असल्याचे आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात झालेल्या प्राथमिक सुनावणीत प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात तोडगा निघावा, यासाठी चर्चेची हालचाल सुरू असून आंदोलक मात्र “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” या भूमिकेवर ठाम आहेत.

याच पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी अडचण निर्माण होत असल्याचा दाखला देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. “मराठा समाजाला आंदोलनाचा अधिकार आहे, पण मुंबई ठप्प करण्याचा आणि मुंबईकरांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दांत न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली. तसेच विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मंगळवारी (२ सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे व बस स्थानकं मोकळी आणि स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत.

Beed Crime: बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी उचलले टोकाचे पाऊल, बीडच्या अंबाजोगाईती

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर वैद्यकीय पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे. आंदोलक मात्र “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” या भूमिकेवर ठाम असून, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदानवगळता मुंबई रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलका नवी मुंबईतील खारघर याठिकाणी पोहचू लागले आहेत. न्यायालयाने आणि प्रशासनाने मराठा आंदोलकांना खारघरमध्ये आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. पण त्याचवेळी मराठा आंदोलनाला विरोध करणारे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी फेसबूकवर पोस्ट शेअऱ करत त्यांची भूमिका मांडली आहे. “ आपण रोज परप्रांतीयांचाी गर्दी सहन करतो, मात्र आज आपला मराठी बांधव मुंबईत आला तर त्यांचा थोडासा त्रास अभिमानाने सहन करू.” असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच, मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो. आता आपले हक्काचे मराठी भाषिक आले आहेत, तर त्यात वावगं काय आहे? थोडासा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करू, आमचे राज ठाकरे नेहमीच सांगतात, मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे!”

Web Title: Mns supports maratha reservation protest we endure the crowds of migrants every day mns supports maratha protesters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • Maratha Reservation
  • MNS

संबंधित बातम्या

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
1

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
2

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
3

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी
4

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.