Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?

Chhath Puja: पिंपरी-चिंचवड शहर मनसेने उत्तर भारतीय बांधवांकडून पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर करण्यात येणाऱ्या छटपूजेच्या तयारीवर आक्षेप घेतला आहे. घाटांवर रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याच्या प्रकारावर मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2026 | 08:45 PM
उत्तर भारतीय समाज पिंपरी चिंचवड शहराचा अविभाज्य घटक- विजय गुप्ता 

उत्तर भारतीय समाज पिंपरी चिंचवड शहराचा अविभाज्य घटक- विजय गुप्ता 

Follow Us
Follow Us:
  • उत्तर भारतीय समाज पिंपरी चिंचवड शहराचा अविभाज्य घटक- विजय गुप्ता 
  • छटपूजेवरून वाद नको, सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन 
  • मनसेच्या भूमिकेवर पिंपरी चिंचवड छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांच भाष्य
पिंपरी-चिंचवड/ Chhath Puja: पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर छटपूजेच्या तयारीदरम्यान रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याचा प्रकार प्रसारमाध्यमांद्वारे आमच्या निदर्शनास आला आहे. पिंपरी घाटावर कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून रेषा आखण्याचे कृत्य केले आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून आम्हीही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. मात्र, या एका घटनेवरून संपूर्ण उत्तर भारतीय समाजाला लक्ष्य करणे किंवा छटपूजेच्या उत्सवाबाबत वाद निर्माण करणे योग्य नाही. शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन हनुमान मित्र मंडळ आणि पिंपरी चिंचवड छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय आर. गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर मनसेने उत्तर भारतीय बांधवांकडून पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर करण्यात येणाऱ्या छटपूजेच्या तयारीवर आक्षेप घेतला आहे. घाटांवर रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याच्या प्रकारावर मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. संस्कृतीला सोडून घाटांवर पट्टे मारून सातबारा केल्यासारखी नावे लिहिण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. देवपूजेला आमचा विरोध नसून सार्वजनिक घाटांवर अशा पद्धतीने हक्क सांगण्याला विरोध असल्याचेही मनसेने स्पष्ट केले आहे.

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

या पार्श्वभूमीवर विजय आर. गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही घाटाचा सातबारा आमच्या नावावर केलेला नाही. उत्तर भारतीय समाजातील बहुतांश नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. अनेकांचे कुटुंब, व्यवसाय, रोजगार आणि मुलांचे शिक्षण याच शहराशी जोडलेले आहे. त्यामुळे या शहराविषयी आमच्या मनात आपुलकी आणि आत्मीयतेची भावना आहे. आम्ही या शहराचे नागरिक आहोत. छटपूजा हा आमच्या समाजाचा महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शहरातील घाटांवरच आम्ही हा उत्सव श्रद्धेने साजरा करीत आहोत. यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा सार्वजनिक जागेवर स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही.

शहरातील बहुतांश घाटांची सद्यस्थिती पाहता तेथे स्वच्छता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. अनेक ठिकाणी घाटांवर कचरा, अस्वच्छता आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महापालिकेच्या यंत्रणेवर पूर्णपणे अवलंबून न राहता उत्तर भारतीय समाजबांधव एकत्र येऊन अनेक घाटांची स्वच्छता स्वतःच्या खर्चातून करतात. छटपूजेच्या पार्श्वभूमीवर घाट स्वच्छ करणे, परिसर व्यवस्थित ठेवणे आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजबांधव पुढाकार घेतात. त्यामुळे घाटांच्या स्वच्छतेसाठी आणि व्यवस्थेसाठी योगदान देणाऱ्या समाजाला केवळ एका खोडसाळ प्रकारावरून दोषी धरणे योग्य ठरणार नाही.

आजवर छटपूजेच्या निमित्ताने शहरात अशा प्रकारचा वाद निर्माण झालेला नाही. दरवर्षी उत्तर भारतीय समाजबांधव अत्यंत शांततेत, श्रद्धेने आणि धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा करतात. यंदाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शहरातील शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राहील, याची आम्ही दक्षता घेऊ. घाटांवर रेषा आखणे, नावे लिहिणे किंवा इतरांना गैरसोय होईल असे कृत्य करणे आम्हालाही मान्य नाही. ज्यांनी हा प्रकार केला असेल त्यांनीही सार्वजनिक ठिकाणांचा आदर राखावा, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Chhath Puja: छट पूजा समाप्तीच्या दिवशी या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, शुक्र ग्रह करणार संक्रमण

समाजबांधवांना आवाहन…  

”कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी पडू नका. घाटांवर स्वच्छता राखा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि धार्मिक उत्सव साजरा करताना इतरांच्या भावनांचाही आदर करा. अशा निंदनीय प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. आम्हाला कोणत्याही वादाला खतपाणी घालायचे नाही. छटपूजा हा श्रद्धेचा आणि निसर्गोपासनेचा उत्सव आहे. त्यामुळे त्याला राजकीय किंवा प्रादेशिक वादाचे स्वरूप न देता सर्वांनी एकोप्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे.”                                                        – विजय आर. गुप्ता,
कार्याध्यक्ष – कार्याध्यक्ष, पिंपरी चिंचवड छटपूजा समिती…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी घाटावर नेमके काय घडले आहे?

    Ans: पिंपरी घाटावर कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून रेषा आखण्याचे कृत्य केले आहे.

  • Que: छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय आर. गुप्ता काय म्हणाले?

    Ans: छटपूजेच्या उत्सवाबाबत वाद निर्माण करणे योग्य नाही. शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: North indian community integral part of pcmc said working president chhath puja committee vijay gupta tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Chhath Puja
  • MNS
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा…; मनसेचा प्रशासनाला इशारा 
1

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा…; मनसेचा प्रशासनाला इशारा 

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग
2

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात
3

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले
4

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.