Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा…; मनसेचा प्रशासनाला इशारा 

संगमवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 09, 2026 | 12:55 PM
संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा...; मनसेचा प्रशासनाला इशारा 

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा...; मनसेचा प्रशासनाला इशारा 

Follow Us
Follow Us:
  • संगमवाडीत महिनाभरापासून पाणीटंचाई
  • पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याची मागणी
  • मनसेकडून आंदोलनाचा इशारा
पुणे : संगमवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संगमवाडी येथील प्रलंबित पाण्याच्या टाकीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे आणि नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. संगमवाडी परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्याची व्यवस्था करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेअभावी नागरिकांचे हाल होत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मनसेने म्हटले आहे.

संगमवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कामकाजातील दिरंगाईमुळे हे काम रखडल्याचा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित कामाचा तातडीने आढावा घेऊन प्रलंबित बांधकाम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करावे. तसेच परिसरातील नागरिकांना नियमित, पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

दरम्यान, वारंवार मागणी करूनही प्रशासनाने पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुहास निम्हण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि संगमवाडीकरांचा पाणीप्रश्न कधी मार्गी लावते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संगमवाडी परिसरातील नागरिकांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे?

    Ans: संगमवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

  • Que: मनसेने महापालिका प्रशासनाकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: संगमवाडी येथील प्रलंबित पाण्याच्या टाकीचे बांधकाम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करून नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

  • Que: मागण्या मान्य न झाल्यास मनसेने काय इशारा दिला आहे?

    Ans: पाणीप्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

Web Title: The mns has issued a warning to the pune municipal corporation administration nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • MNS
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Diwali 2026: दिवाळीचा आनंद फक्त स्वतःपुरता नको! साहित्यिकांनी सांगितला सण साजरा करण्याचा नवा मंत्र
1

Diwali 2026: दिवाळीचा आनंद फक्त स्वतःपुरता नको! साहित्यिकांनी सांगितला सण साजरा करण्याचा नवा मंत्र

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय
2

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल
3

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल

Marathi Rangbhumi: नाटकाची संकल्पना ते प्रत्यक्ष सादरीकरण; पुण्यात रंगकर्मींचा अनोखा प्रयोग चर्चेत
4

Marathi Rangbhumi: नाटकाची संकल्पना ते प्रत्यक्ष सादरीकरण; पुण्यात रंगकर्मींचा अनोखा प्रयोग चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.