
जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ (Photo Credit - X)
मुंबई: मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) असलेल्या दोनपैकी एक एमआरआय मशीन (MRI Machine) बिघाडामुळे बंद पडल्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बिघाडाचा थेट परिणाम एमआरआय तपासणीच्या वेळेवर झाला असून, प्रतीक्षेचा कालावधी १५ दिवसांवरून थेट तीन महिन्यांवर (म्हणजे सहापटीने) वाढला आहे. यामुळे, ज्या रुग्णांना लवकर तपासणी मिळायची, त्यांना आता पुढील वर्षाची तारीख मिळत आहे. नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने तेथील रुग्णांचा भारही जेजे रुग्णालयावर पडत आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच रुग्ण या लांबलेल्या प्रतीक्षा यादीत अडकले आहेत.
दहा वर्षे जुनी मशीन दुरुस्तीसाठी ‘अशक्य’
रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिघडलेली एमआरआय मशीन जवळपास दहा वर्षे जुनी आहे आणि ती जुन्या विंडोज एक्सपी (Windows XP) प्रणालीवर चालते. या मशीनसाठी लागणारे डीडीआर-१ रॅम (DDR-1 RAM) सारखे जुने संगणकीय घटक आता बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या मशीनची दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. एकेकाळी दोन मशीनमुळे एमआरआयची वाट पाहण्याचा कालावधी कमी झाला होता, पण आता परिस्थिती उलटली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा: Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…
पीपीपी मॉडेल विरोधात विद्यार्थी
नवीन एमआरआय मशीन खरेदी करण्याऐवजी राज्य सरकार आता एमआरआय आणि सीटी स्कॅन सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे देण्याचा विचार करत आहे. मात्र, वैद्यकीय विद्यार्थी आणि रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
विरोधामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती: