
मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित
मेट्रो हाऊस येथे असलेल्या या आउटलेटमध्ये तपासणीदरम्यान झुरळांचा वावर, स्वयंपाकघरात साचलेला अन्नकचरा, अस्वच्छ साफसफाईची कापडे आणि अन्नाच्या संपर्कातील पृष्ठभागांवर स्वच्छतेचा अभाव आढळला. तयार अन्न हाताळण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी हात न धुता काम केल्याचेही निरीक्षणात समोर आले. त्याचबरोबर उघड्या अन्नपदार्थांच्या वर असलेल्या दिव्यांना संरक्षक कवच नसल्याने धूळ आणि संभाव्य दूषिततेचा धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, संबंधित आस्थापनाने १२ ऑगस्ट रोजी १४८ पानी अनुपालन अहवाल सादर करून सर्व त्रुटी दूर केल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष तपासणीत हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने एफडीएने याची गंभीर दखल घेतली आहे.
स्वयंपाकघरात माशांचा वावर, मृत झुरळ
प्रतिष्ठित द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडच्या अन्न व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. १९ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने क्लबचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील विविध भागांत माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळला. तसेच मृत झुरळ आढळून आले असून, भांडी धुण्याच्या परिसरात झुरळ पकडण्यासाठी लावलेले ट्रॅप उघड्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
नरीमन पॉइंटमध्ये रेस्टॉरंटवर कारवाई
ग्राहकाच्या एका तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंट येथील ‘स्टेटस रेस्टॉरंट’वर तातडीची कारवाई केली आहे. तपासणीत अन्नसुरक्षेच्या नियमांची अनेक गंभीर उल्लंघने आणि अस्वच्छता आढळून आल्याने संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
ग २० ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत रेस्टॉरंटला अन्नपदार्थांची खरेदी, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासणीत कर्मचारी स्वच्छ भांड्यांवरच चेहरा धुत असल्याने सांडपाणी भांड्यांवर उडत असल्याचे आढळले.
झुरळ प्रतिबंधक ट्रॅपचा अभाव