
फोटो सौजन्य- gemini
मिठी सुधारण्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगरे व दक्षिण मुंबई यांच्यातील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी, वांद्रे आणि धारावी दरम्यानच्या नवीन पुलाच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून महापालिका लवकरच गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू करणार आहे. गर्डर जागेवर दाखल झाले असून जोडणीचे काम सुरू आहे. सुमारे २०४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेली), धारावी आणि माहीम कॉजवे येथे ये-जा करणाऱ्या चालकांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र वाढवण्याच्या आणि नदीचा प्रवाह सुव्यवस्थित करण्याच्या योजनेअंतर्गत महापालिकेने सध्याचा सुमारे ५० वर्षे जुना पूल पाडून त्या जागी एक अधिक रुंद पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला २०१९ मध्ये अंतिम मंजुरी मिळाली. यानंतर महापालिकेने टप्याटप्याने बांधकाम सुरू केले, सध्याच्या प्रलाची क्षमता १० लेनपर्यंत वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
संपूर्ण प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. पहिल्या टण्यात महापालिकेने सध्याच्या पुलाच्या पश्चिम बाजूला लागून एक नवीन पूल बांधला. दुसऱ्या टप्प्यात जुन्या पुलाच्या पूर्व बाजूला आणखी एक नवीन पूल बांधला जात आहे.
या दुसऱ्या टप्प्यात गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात, वाहतूक दोन्ही नवीन पुलांवर वळवली जाईल. त्यानंतर, सुमारे पाच दशके जुना सध्याचा पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधला जाईल. दोन्ही नवीन पुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर, बांधकामादरम्यान वाहतुकीत कमीत कमी अडथळा यावा यासाठी जुना पूल पाडला जाईल.
हा नवीन पूल वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह रोड जंक्शनजवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून सुरू होईल आणि मिठी नदीच्या दक्षिणेला सुमारे ११० मीटर अंतरावर धारावीच्या बाजूला जोडला जाईल. याच्या बांधकामामुळे बीकेसी, धारावी आणि माहीम कॉजवे दरम्यानची वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, चितळे समितीच्या शिफारशींनुसार, मिठी नदी रुंदीकरण योजनेचा एक भाग म्हणून या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुरू आहे. गर्डर जागेवर आले असून त्यांची जोडणी केली जात आहे. या नवीन पुलामुळे नदीचा प्रवाह सुधारेल आणि उपनगरे व दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास सुलभ होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: मिठी नदीवर वांद्रे आणि धारावी यांना जोडण्यासाठी हा नवीन पूल उभारला जात आहे.
Ans: पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू आहे.
Ans: बीकेसी, धारावी आणि माहीम कॉजवे परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.