Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित

पुणे विभागातील औषध उत्पादक आणि विक्री आस्थापनांवर एफडीएच्या औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. सात महिन्यांत १,६१२ तपासण्या करण्यात आल्या असून, ५०१ आस्थापनांवर नियामक कारवाई करण्यात आली. यामध्ये १३४ परवाने रद्द, तर ३६७ परवाने निलंबित करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 21, 2026 | 08:05 PM
pune-fda-drug-department-action-1612-inspections-501-

pune-fda-drug-department-action-1612-inspections-501-

Follow Us
Follow Us:
  • FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई
  • विक्री आस्थापनांवर सर्वाधिक कारवाई; ३६७ परवाने निलंबित
  • औषध उत्पादक आणि विक्रेत्यांच्या १,६१२ तपासण्या
FDA Pune Action on Medical : पुणे : सुनयना सोनवणे : औषधांच्या उत्पादन आणि विक्री प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या सात महिन्यांत (१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६) पुणे विभागातील औषध उत्पादक आणि विक्री आस्थापनांच्या एकूण १ हजार ६१२ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ५०१ आस्थापनांवर नियामक कारवाई करण्यात आली असून, १३४ आस्थापनांचे परवाने रद्द, तर ३६७ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

एफडीएच्या औषध विभागाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत उत्पादक आणि विक्री अशा दोन्ही प्रवर्गांतील आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये विक्री आस्थापनांवर सर्वाधिक कारवाई झाली. एकूण १ हजार ३०० विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४२५ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११४ आस्थापनांचे परवाने रद्द, तर ३३१ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. अशा एकूण ४४५ आस्थापनांवर कारवाई झाली.

दुसरीकडे, औषध उत्पादक आस्थापनांच्या ३१२ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ७१ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच २० उत्पादकांचे परवाने रद्द, तर ३६ परवाने निलंबित करण्यात आले. उत्पादक प्रवर्गात एकूण ५६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित

दरम्यान, राज्यभरात याच सात महिन्यांच्या कालावधीत ७ हजार ९५० तपासण्या करण्यात आल्या असून, २ हजार ६२९ नियामक कारवायांची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्यस्तरावर १३१ धाडी टाकून सुमारे १७ कोटी ७३ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. तसेच ३७ गुन्हे दाखल करून १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे विभागातील औषध विभागाची कारवाई
(१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६)

  • तपशील – उत्पादक – विक्री
  • तपासण्या – ३१२ – १,३००
  • नोटिसा – ७१ – ४२५
  • परवाने रद्द – २० – ११४
  • परवाने निलंबित – ३६ – ३३१
  • एकूण कारवाई – ५६ – ४४५Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त
एकूण कारवाईचा तपशील
  • एकूण तपासण्या – १,६१२
  • बजावलेल्या नोटिसा – ४९६
  • परवाने रद्द – १३४
  • परवाने निलंबित – ३६७
  • एकूण नियामक कारवाया – ५०१
💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे विभागात औषध विभागाने किती तपासण्या केल्या?

    Ans: १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांत पुणे विभागात औषध उत्पादक आणि विक्री आस्थापनांच्या एकूण १,६१२ तपासण्या करण्यात आल्या.

  • Que: पुणे विभागात किती आस्थापनांवर नियामक कारवाई झाली?

    Ans: एकूण ५०१ आस्थापनांवर नियामक कारवाई करण्यात आली. त्यापैकी १३४ आस्थापनांचे परवाने रद्द, तर ३६७ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

  • Que: राज्यभरात एफडीएने किती औषधसाठा जप्त केला?

    Ans: राज्यभरात सात महिन्यांत १३१ धाडी टाकून सुमारे १७ कोटी ७३ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

Web Title: Pune fda drug department action 1612 inspections 501 regulatory actions pune news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • FDA Action
  • pune news

संबंधित बातम्या

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित
1

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
2

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र
3

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त
4

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.