Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता खूप झाले!’ : कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश

मुंबईतील वाढत्या कचरा आणि अस्वच्छतेच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. परिस्थिती न सुधारल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2026 | 10:44 AM
'आता खूप झाले!' : कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश

'आता खूप झाले!' : कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी असल्याने न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढले.
  • परिस्थितीत सुधारणा न झाल्यास सहाय्यक आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले.
  • कचरा टाकणाऱ्यांवर मोठा दंड, फौजदारी कारवाई आणि स्वच्छतेसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मदत घेण्याची सूचना करण्यात आली.
मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांवर टाकणात येणाऱ्या कचऱ्यावरून मुंबई महापालिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी ताशेरे ओढले. संपूर्ण शहर ठिकठिकाणी घाण, दुर्गंधी कचऱ्याने वेढलेले आहे, असे निरीक्षण नोंदवून या परिस्थितीत सुधारणा न केल्यास प्रत्येक विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांसह घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला.

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

शहरातील कचऱ्याची समस्या ही गंभीर आणि अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. सर्वसामान्यांनाही आपला परिसर स्वच्छ, नीटनेटका राखावा असे वाटत नाही. फोर्ट, दादर, जोगेश्वरी, अंधेरी, ओशिवरा, लोखंडवाला ही शहरात अशी काही ठिकाणे आहेत, जिथे नेहमीच कचऱ्याचे ढोग पडलेले दिसतात आणि तरीही संबंधित विभागीय अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे आम्ही या अधिकाऱ्यांनाही जबाबदार आणि उत्तरदायी धरू, त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. संपूर्ण शहर घाणीने भरलेले आहे. आता खूप झाले. पालिका आम्हाला केवळ खोटी आश्वासने देऊ शकत नाही, अशा शब्दात न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. पालिका अधिकारी हे न्यायालयात फक्त आश्वासित करतात.

क्षेपणभूमीतून पुन्हा पसरतेय दुर्गंधी

सोमवारपासून कचराभूमीतून पुन्हा दुर्गंधी पसरत असल्याची माहिती याचिकाकत्यांकडून न्यायाललयाला देण्यात आली, मध्यरात्री १.३० मिनिटांनी तक्रार करण्यात आली, मात्र त्याला प्रत्युत्तर पहाटे ५.३० वाजता मिळाल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करून तक्रार आल्यानंतर त्याचे वेळीच निराकरण का होत नाही, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला,

एसओपी आवश्यक असल्याचे खंडपीठाचे निरीक्षण

आम्हाला पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली (एसओपी) असणे आवश्यक असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले, महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात पावले उचलली असली तरी. प्रत्यक्ष परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही आणि वॉर्ड अधिकारी काम करीत नसल्याचे आढळून आल्याचेही न्यायालयाने नमूद केले. सुखा, ओला, सॅनिटरी आणि वैद्यकीय कचरा असे विभाजक करून त्याची विल्टेलाट लावण्यावर भर द्या.

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

सिंगापूर पॅटर्नचा उल्लेख; इन्फ्लुएन्सर्सची मदत घ्यावी

मुंबईत सर्वत्र केवळ घाणच पसरलेली आहे. आपण स्वतःला आंतरराष्ट्रीय शहर कसे म्हणू शकतो? असे खंडपीठाने म्हटले. सिंगापूरमध्ये रस्त्यावर किवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर २ ते १० हजार डॉलर्सचा दंड आकारला जातो. आपल्याकडेही सार्वजनिक रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर मोठा दंड आकारणे आणि त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने राज्य सरकारला सुचवले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवल्याप्रमाणे, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’ची मदत घेण्याचा सल्लाही न्यायालयाने पालिकेला दिला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Mumbai garbage problem high court slams bmc officers action warning cleanliness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • High court
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
1

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Khopoli : खोपोली नगरपरिषदेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेविकेच्या दाव्याने खळबळ
2

Khopoli : खोपोली नगरपरिषदेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेविकेच्या दाव्याने खळबळ

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
3

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन
4

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.