Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई उच्च न्यायालयाकडून SD Corporation ला दिलासा! कथित मानहानीकारक सोशल मीडिया पोस्ट्सवर अंतरिम निर्बंध

मुंबई उच्च न्यायालयाने SD Corporation Pvt. Ltd. ला मानहानीच्या खटल्यात अंतरिम दिलासा देत कंपनीविरोधातील कथित मानहानीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करण्यास संबंधित प्रतिवादींना मनाई केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 09:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मानहानी प्रकरणात SD Corporation ला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा.
  • कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट्सवर न्यायालयाची तात्पुरती मनाई.
  • पुनर्विकास प्रकल्पात अडथळा आणू नये, प्रतिवादींना उच्च न्यायालयाचे निर्देश.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईस्थित SD Corporation Pvt. Ltd. ला मानहानीच्या खटल्यात अंतरिम दिलासा दिला आहे. कंपनी आणि तिच्या म्हाडा (MHADA) पुनर्विकास प्रकल्पाबाबत कथित मानहानीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करण्यास न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना अंतरिम मनाई केली आहे. न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी २७ जुलै रोजी हा आदेश दिला.

PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…

SD Corporation ने देवांग दवे, अमित कावळे आणि विष्णू भोसले यांच्याविरोधात ₹१०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. कंपनीच्या याचिकेनुसार, प्रतिवादींनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कांदिवली (पूर्व) येथील समता नगरमधील पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात चुकीची, दिशाभूल करणारी आणि मानहानीकारक माहिती प्रसारित केली. या पोस्टमध्ये कंपनी आणि म्हाडावर भ्रष्टाचार व फसवणुकीचे आरोप करण्यात आले तसेच ‘सरोवा’ प्रकल्पावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या पोस्टमुळे तिची प्रतिमा आणि व्यावसायिक हितसंबंधांना धक्का पोहोचला. याचिकेत देवांग दवे यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून स्थानिक नागरिकांना भडकवण्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पोलिसांची परवानगी नसतानाही प्रकल्प परिसरात मोर्चा काढून विक्री प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोपही कंपनीने केला आहे.

SD Corporation च्या माहितीनुसार, हा पुनर्विकास प्रकल्प ५५ एकर परिसरातील ७४ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या १६६ इमारतींचा समावेश असलेला आहे. या प्रकल्पात सुमारे २,९०० भाडेकरू असून, त्यापैकी २,००० हून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याचा दावा कंपनीने न्यायालयात केला. कंपनीच्या वतीने ज्येष्ठ वकील चेतन कपाडिया यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, १३ मे २०२६ रोजी ‘सीज अँड डेसिस्ट’ नोटीस पाठवूनही कथित मानहानीकारक मजकूर प्रसारित केला जात राहिला. त्यामुळे संबंधित मजकूर हटवण्याबरोबरच भविष्यात अशा प्रकारचे साहित्य प्रकाशित करण्यास कायमस्वरूपी मनाई करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.

दुसरीकडे, प्रतिवादी देवांग दवे यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना संबंधित विधाने सत्यावर आधारित असून ती काही गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींचे प्रतिबिंब असल्याचा दावा केला. मात्र, सुनावणीदरम्यान दवे हे या पुनर्विकास प्रकल्पाचे सदस्य, खरेदीदार किंवा संभाव्य खरेदीदार नसल्याचेही न्यायालयात मान्य करण्यात आले.

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी कंपनीची बाजू ग्राह्य धरली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वापरण्यात आलेले “भ्रष्ट”, “फसवणूक” आणि “स्कॅम” यांसारखे शब्द प्रथमदर्शनी मानहानीकारक असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने प्रतिवादींना SD Corporation विरोधात अशा प्रकारचा मजकूर प्रसिद्ध किंवा प्रसारित करण्यास तसेच पुनर्विकासाच्या कामात अडथळा आणण्यास अंतरिम मनाई केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात होणार आहे.

Web Title: Mumbai high court relief to sd corporation defamation case social media posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड
1

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश
2

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.