Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Megablock : रविवारी ‘या’ मार्गावर होणार प्रवाशांचा खोळंबा, कोणत्या लोकल रद्द, कोणते मार्ग बंद, पाहा वेळापत्रक

Mumbai Local News: मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (19 जानेवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक कुठे आणि किती वाजता असणार आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 18, 2025 | 05:58 PM
रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा

रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा

Follow Us
Follow Us:

Central Railway Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून रविवारी (19 जानेवारी) रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक जाहीर केला आहे. तर पश्चिम रेल्वेने भाईंदर-बोरिवली दरम्यान अप फास्ट मार्गावर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे काही गाड्या उशिरा धावणार आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

‘या’ लाडक्या बहीणींचे सरकारने दिलेले आत्तापर्यंतचे सर्व पैसे घेणार परत…; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

माटुंगा-मुलुंड (अप आणि डाउन जलद मार्ग)

वेळ: सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० (अप-डाऊन फास्ट)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०:५८ ते दुपारी ३:१० दरम्यान सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा येथे डाउन स्लो मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या सर्व स्लो मार्गावरील स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर सामील होतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास सुमारे १५ मिनिटे उशिराने येतील.

तर सकाळी ११:२५ ते दुपारी ३:२७ दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे अप स्लो मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावरील स्थानकांवर थांबतील आणि नंतर माटुंगा येथे अप फास्ट मार्गावर परत येतील. या गाड्यांमध्येही १५ मिनिटांपर्यंत विलंब होईल.

ट्रान्स-हार्बर लाईन (ठाणे-वाशी/नेरुळ)

वेळ: सकाळी ११:१० ते दुपारी ४:१०

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यानच्या सर्व अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा या काळात तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील. ब्लॉकदरम्यान सकाळी १०:३५ ते दुपारी ४:०७ दरम्यान ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणाऱ्या सर्व सेवा रद्द राहतील. तर सकाळी १०:२५ ते दुपारी ४:०९ दरम्यान पनवेल/नेरुळ/वाशीहून ठाणेला जाणाऱ्या सर्व सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचे वेळापत्रक

पश्चिम रेल्वेवरील भाईंदर ते बोरिवली या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात विरार/वसई रोड ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या अप मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या इच्छित स्थळी उशिरा पोहोचणार आहेत. तयेच या काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या मेगा ब्लॉकला लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

मुंबईत सेलिब्रिटी अन् गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर…; नाना पटोलेंचा सवाल

Web Title: Mumbai local news megablock on sunday 19 january on central and western railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Megablock
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल
1

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
2

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प
3

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

Karjat Lonavala Landslide: मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका; कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प, इतर मार्गांवर विलंब
4

Karjat Lonavala Landslide: मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका; कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प, इतर मार्गांवर विलंब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.