राज्यातील तब्बल 9 लाख 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार नाहीत पैसे; 'या' खासदाराने केलं मोठं विधान (File Photo : Ladki Bahin)
मुंबई : राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. यामध्ये दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व अर्जदार महिलांना योजनेचे पैसे देण्यात आले होते. मात्र आता अपात्र महिलांवर टांगती तलवार असून महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पैसे परत घेणार असल्याचे सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या सरकारने जाहीर केलेल्या नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांना आता पैसे परत घेण्याची भीती आहे. पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांत योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरून मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
महिला योजना थांबवण्यासाठी स्वतःहून अर्ज करत असल्याच्या प्रकारावर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातही काही अर्ज आले होते. या महिन्यातही हे अर्ज येत आहेत. आपण या योजनेसाठी पात्र नाही, असं लक्षात आल्याने काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिकसुद्धा आहेत, हे यातून सिद्ध होतंय”, असे मत आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की , “आतापर्यंत चार हजार मागे आले आहेत. परंतु, ही आकडेवारी अंदाजे आहे. डिसेंबरमध्ये १००-१५० प्राप्त झाले होते. जानेवारीत जास्त प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. या महिलांकडून परत आलेला निधी पुन्हा सरकारी तिजोरीत देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार आहे”, असे मत आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आदिती तटकरे म्हणाल्या की, “पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक प्राप्त लाभार्थी महिला वगळता इतर महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. याकरता परिवहन आणि प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे ही अखंड अविरत सुरू राहणारी प्रक्रिया असेल. परिणामी अर्ज मागे घेण्याऱ्या महिलांच्या आकडेवारीत सतत बदल होऊ शकेल. ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचे जुलैपासून दिलेल्या हप्त्यांचे पैसे परत घेतले जातील. आम्हाला ज्या महिला अपात्र असून त्यांनी अर्ज दाखल केला आहे अशा महिलांना या संदर्भात माहिती दिली जाईल. आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये जमा केले जातील,” अशी भूमिका मंत्री आदिती तटकरे यांनी मांडली आहे.