Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्गाच्या खर्चात 1274.80 कोटींची वाढ, नेमकं कारण काय?

मुंबई मेट्रो मार्ग-4 (वडाळा - कासारवडावली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल 1274.80 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तब्बल 5 वर्ष प्रकल्पाला दिरंगाई झाली असून मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 22, 2025 | 11:09 PM
मुंबई मेट्रो मार्गाच्या खर्चात 1274.80 कोटींची वाढ, नेमकं कारण काय?

मुंबई मेट्रो मार्गाच्या खर्चात 1274.80 कोटींची वाढ, नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:

मुंबई मेट्रो मार्ग-4 (वडाळा – कासारवडावली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल 1274.80 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तब्बल 5 वर्ष प्रकल्पाला दिरंगाई झाली असून मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांना सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा – कासारवडावलीचे काम RInfra- ASTALDI आणि CHEC- TPL या कंपनीला 12 एप्रिल 2018 रोजी देण्यात आले होते. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग असून, सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके आहेत. सदर काम जुलै 2021 रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ऑगस्ट 2026 अशी आहे.

अनिल गलगली यांनी प्रकल्पाच्या खर्च वाढीमुळे आणि वेळेत काम पूर्ण न होण्यामुळे दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा – कासारवडावली प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा 2632.25 कोटी इतका होता. आता यात 1274.80 कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. खर्चात वाढ आणि 5 वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते पण दुर्दैवाने अद्यापही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.

हा मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. तरीसुद्धा अश्या महत्वाच्या प्रकल्पात झालेली दिरंगाई ही मुंबईकरांच्या सेवेच्या दृष्टीने घातक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. खर्च वाढीबाबत गलगली यांनी सरकारकडे आणि एमएमआरडीएकडे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे. एका वृत्त वाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Web Title: Mumbai metro wadala kasarvadavali line cost increase 127480 crore rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 11:09 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
1

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

IRCTC Tour: भाविकांसाठी सुवर्णसंधी! यंदाच्या श्रावणात IRCTC कडून ‘सप्त ज्योतिर्लिंग विशेष यात्रा’ जाहीर
2

IRCTC Tour: भाविकांसाठी सुवर्णसंधी! यंदाच्या श्रावणात IRCTC कडून ‘सप्त ज्योतिर्लिंग विशेष यात्रा’ जाहीर

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
3

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे
4

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.