Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…

दादर रेल्वे स्टेशनवरून १७ वर्षीय मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आलेल्या मुलीला चाइल्ड हेल्पलाइन, मुंबई शहर आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने तातडीने बालगृहात दाखल केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 17, 2026 | 05:53 PM
Minor girl from Chhattisgarh rescued from Dadar railway station

Minor girl from Chhattisgarh rescued from Dadar railway station

Follow Us
Follow Us:
  • दादर रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका
  • चाइल्ड हेल्पलाइन, मुंबई शहर आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाची कार्यवाही
  • सोशल मीडियामुळे परिचित व्यक्तीला भेटायला आलेली तरुणी
Dadar Railway Station minor girl rescued : मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर चाइल्ड हेल्पलाइन, मुंबई शहर आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करून तिला बाल संरक्षण यंत्रणेच्या स्वाधीन केले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली आहे. मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिला बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

पत्रकात दिलेल्या माहितीनुसार दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मानवी तस्करीविरोधी पथकाकडून संबंधित मुलीबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणे, रेल्वे सुरक्षा दलाला देखील रेल मदद पोर्टलच्या माध्यमातून यासंदर्भात संदेश प्राप्त झाला होता. मुलीची सुरक्षितता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी ही माहिती चाइल्ड हेल्प लाईन आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकासोबत सामायिक केली.

माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइन आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने तातडीने ऑनलाइन समन्वय बैठक घेऊन पुढील कार्यवाहीचे नियोजन केले. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १३/१४ येथे प्रत्यक्ष भेट देऊन (आउटरीच) मुलीची ओळख पटविण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन आणि जीआरपी यांच्या संयुक्त सहकार्याने मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

प्राथमिक संवादादरम्यान मुलीने ती छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्याची रहिवासी असून इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी ती मुंबई येथे आली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे वय, सुरक्षितता आणि संरक्षणाची गरज लक्षात घेऊन आवश्यक बाल संरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली.

तरुणी बालगृहात सुरक्षित दाखल

जीआरपी पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीची जेजे रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिची सुरक्षितता, निवास, देखभाल आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी बाल कल्याण समितीच्या प्रक्रियेनुसार तिला सुखरूप बालगृहात दाखल करण्यात आले.

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

या कार्यवाहीच्या अनुषंगाने दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी संबंधित पथकासोबत बैठक घेऊन मुलीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने दाखविलेली तत्परता, सक्रियता, समन्वय आणि बाल संरक्षणाप्रती असलेली बांधिलकी यांचे विशेष कौतुक केले. रेल्वे स्थानकावर पथक सातत्याने कार्यरत असल्यामुळे आणि बालकांच्या संरक्षणासाठी संवेदनशीलतेने काम करत असल्यामुळेच ही महत्त्वपूर्ण माहिती पथकासोबत सामायिक करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातही याच तत्परतेने आणि समर्पित भावनेने कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी पथकातील सदस्यांना केले.

ही संपूर्ण कार्यवाही चाइल्ड हेल्पलाइन, मुंबई शहर, रेल्वे चिल्ड्रेन इंडिया, राजकीय रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि मानवी तस्करीविरोधी पथक यांच्यातील प्रभावी समन्वय, तत्पर प्रतिसाद आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: . दादर रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीची कशी सुटका करण्यात आली?

    Ans: चाइल्ड हेल्पलाइन, रेल्वे चिल्ड्रेन इंडिया आणि जीआरपी यांच्या समन्वयाने दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १३/१४ येथे मुलीची ओळख पटवून तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

  • Que: अल्पवयीन मुलगी मुंबईत का आली होती?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी ती छत्तीसगडमधून मुंबईत आली होती.

  • Que: सुटका केल्यानंतर मुलीला कुठे दाखल करण्यात आले?

    Ans: कायदेशीर प्रक्रिया आणि प्राथमिक आरोग्य तपासणीनंतर बाल कल्याण समितीच्या प्रक्रियेनुसार मुलीला तिच्या सुरक्षिततेसाठी बालगृहात दाखल करण्यात आले.

Web Title: Minor girl from chhattisgarh rescued from dadar railway station crime news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • crime news
  • Dadar Railway Station
  • Indian Railway

संबंधित बातम्या

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
1

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप
2

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप

Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!
3

Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक
4

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.