
Success has many fathers...; मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची 'ती' पोस्ट चर्चेत
टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तिन्ही हल्लेखोरांनी रविवारी रात्री वसई येथून जयपूरला जाणारी ट्रेन पकडली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या जलद हालचालींमुळे या तिन्ही हल्लेखोरांना सोमवारी सकाळी १० वाजता कोटा रेल्वे स्थानकात राजस्थान पोलिसांनी अलगदपणे पकडले. मात्र, या सगळ्या ऑपरेशनसाठी मुंबई पोलिसांनी कोटा पोलिसांना महत्त्वाची माहिती पुरवली होती. परंतु, कोटा पोलिसांनी आरोपींना आपण एकट्यानेच पकडल्याचे श्रेय घेण्यासाठी लगेच पत्रकार परिषदही घेऊन टाकली.
मुळात या आरोपींना पकडल्यानंतर त्यांना मुंबईला नेले जाणार होते. मात्र, कोटा पोलिसांनी या आरोपीना प्रसारमाध्यमांसमोर आणत एक जंगी पत्रकार परिषदच घेऊन टाकली. कोटा शहर येथील पोलीस अधीक्षक आणि आयपीएस तेजस्विनी गौतम यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यामुळे मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारती यांच्या वक्तव्याचा रोख राजस्थान पोलिसांकडे?
देवेन भारती यांच्या या वक्तव्याचा रोख राजस्थान पोलिसांच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे. आयपीएस तेजस्विनी गौतम यांनी आमच्या घोलीस दलाने कसा सापळा रचून तीन आरोपींना पकडले, याचा पाढा वाचला. ही पत्रकार परिषद देशातील सर्व प्रमुख प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर लाईव्ह दाखवण्यात आली.
FAQ
प्रश्न 1 : देवेन भारतींनी काय पोस्ट केली? नेमका वाद काय?
– Tiger Shroff च्या गाडीवर गोळीबार झाला. मुंबई पोलिसांनी CCTV फुटेज, ट्रॅकिंग, तपास करून 3 आरोपी ट्रेनने पळाल्याची माहिती काढली. राजस्थान पोलिसांना ट्रेन नंबर + कोच डिटेल्स दिली. त्यावरून श्रेयवाद सुरु झाला.
प्रश्न 2 : Tiger Shroff फायरिंग केस काय आहे?
– अलीकडेच अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. मुंबई क्राईम ब्रांचचा तपास सुरु होता. आरोपी फरार होते. ट्रेन पकडून राजस्थानकडे पळाले. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांना याची माहिती दिली.