Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff : ‘डर तो लगता है, ऐसी मौत नहीं मरना’; टायगर श्रॉफवरील गोळीबाराने अभिनेत्रींना धडकी

Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेने बॉलिवूडमध्ये चिंता वाढली आहे. पूनम पांडे, नीतू चंद्रा, कुनिका सदानंद आणि उर्वशी रौतेला यांनी मुंबईच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली भीती.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 19, 2026 | 07:00 PM
Tiger Shroff : 'डर तो लगता है, ऐसी मौत नहीं मरना'; टायगर श्रॉफवरील गोळीबाराने अभिनेत्रींना धडकी

Tiger Shroff : 'डर तो लगता है, ऐसी मौत नहीं मरना'; टायगर श्रॉफवरील गोळीबाराने अभिनेत्रींना धडकी

Follow Us
Follow Us:
  • पूनम पांडे, नीतू चंद्राकडून घटनेवर चिंता
  • मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • कलाकारांच्या सुरक्षिततेबाबत नव्याने चर्चा
 

अभिनेता टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात प्रसिद्ध अभिनेत्याला लक्ष्य करण्यात आल्याने सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अभिनेत्री पूनम पांडे, नीतू चंद्रा, कुनिका सदानंद आणि उर्वशी रौतेला यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अशी मृत्यूची वेळ नको; पूनम पांडेला धक्का

अभिनेत्री पूनम पांडे हिने या घटनेची बातमी ऐकल्यानंतर काही काळ आपल्याला विश्वासच बसला नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, गोळीबाराच्या घटनेतील संशयित तरुणांचे व्हिडिओ पाहून तिला धक्का बसला. चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या गुंडांपेक्षा हे तरुण वेगळे वाटत होते. टायगर श्रॉफसारख्या मोठ्या अभिनेत्याला लक्ष्य करण्यात आल्याने तिला आश्चर्य वाटले.

ती पुढे म्हणते, एखादी व्यक्ती फुटबॉल खेळून घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला होणे ही अत्यंत भीतीदायक बाब आहे. आपण आज सुरक्षित आहोत, पण पुढच्या क्षणी काय घडेल, याची खात्री देता येत नाही. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.

लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पूनम म्हणाली, भीती तर वाटतेच ना! आम्हाला अशा प्रकारे मरायचे नाही. ही घटना खूप भयानक आहे. कार्यक्रमांमध्ये सुरक्षारक्षक असले, तरी प्रत्येक ठिकाणी सुरक्षा घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे कलाकारांनी आपल्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे तिने सांगितले.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

मुंबईत असे घडेल, असे वाटले नव्हते : नीतू चंद्रा

अभिनेत्री नीतू चंद्रा हिलाही सुरुवातीला ही बातमी खोटी असल्याचे वाटले. मुंबईत अशा प्रकारची घटना घडू शकते, यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मात्र, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तिला भीती वाटू लागली.

नीतू म्हणाली की, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. कलाकार मॉल, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना जात असतात. अशा वेळी बाहेर पडणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न आता निर्माण होत असल्याचे तिने नमूद केले.

महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास व्यक्त करत तिने या प्रकरणात योग्य कारवाई होईल आणि नागरिकांना पुन्हा सुरक्षित वाटेल, अशी आशा व्यक्त केली. अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या सुरक्षेबद्दलही तिने चिंता व्यक्त केली.

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडने आता जागे व्हावे : कुनिका सदानंद

अभिनेत्री कुनिका सदानंद हिने या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे आवाहन केले. सरकारचे समर्थन करताना सरकारकडून नागरिकांच्या आणि कलाकारांच्या सुरक्षेसाठी काय केले जात आहे, याचाही विचार करायला हवा, असे ती म्हणाली.

कलाकार, त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढून येणाऱ्या सामान्य प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठीही आवाज उठवणे आवश्यक असल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत आपल्या संवेदना असल्याचे सांगत तिने प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास आणि पोलिसांची पुढील कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पूनम पांडेने काय म्हटले?

    Ans: या घटनेमुळे आपल्याला धक्का बसल्याचे सांगत तिने कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या मृत्यूची भीती वाटत असल्याचेही तिने नमूद केले.

  • Que: नीतू चंद्राने कोणती चिंता व्यक्त केली?

    Ans: मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अशी घटना घडल्याने तिने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली. कलाकारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली.

  • Que: कुनिका सदानंदने बॉलिवूडला काय आवाहन केले?

    Ans: कलाकारांनी कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठवावा, असे आवाहन तिने केले.

Web Title: Tiger shroff firing bollywood actresses concerned mumbai security rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Firing News
  • tiger shroff
  • Urvashi Rautela

संबंधित बातम्या

Actor Tiger Shroff Firing Case: जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार; पण नेमकं काय शिकलाय ‘हा’ अभिनेता?
1

Actor Tiger Shroff Firing Case: जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार; पण नेमकं काय शिकलाय ‘हा’ अभिनेता?

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं
2

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ
3

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
4

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.