Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Tiger Shroff Firing Case: जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार; पण नेमकं काय शिकलाय ‘हा’ अभिनेता?

Actor Tiger Shroff Firing Case: रविवारच्या संध्याकाळी मुंबईच्या जुहू भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. या हल्ल्यात त्याच्या ड्रायव्हरसह दोन जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता टायगर श्रॉफ किती शिकला आहे? हे जाणून घेऊया

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 19, 2026 | 06:21 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Actor Tiger Shroff Firing Case: रविवारच्या संध्याकाळी मुंबईच्या जुहू भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. या हल्ल्यात त्याच्या ड्रायव्हरसह दोन जण जखमी झाले आहेत. बाईकवरील तीन हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता फुटबॉल सामना खेळून आपल्या कारमधून बाहेर पडत असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला आणि सलग गोळीबार केला. या हल्ल्यातून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला.

मुंबईचे पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा टायगर श्रॉफ फुटबॉलचा सामना खेळून तिथून निघत होता. दरम्यान, या गोळीबारात अभिनेत्याचा ड्रायव्हर फिरदौस याच्या डाव्या हाताला दुखापत झाली, तर इतर एक व्यक्तीही यात जखमी झाली. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या घटनेनंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, काही लोकांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा केला आहे. याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणाचा वेगाने तपास करण्याचे आणि दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. चला तर मग, या पार्श्वभूमीवर अभिनेता टायगर श्रॉफ किती शिकला आहे? हे जाणून घेऊया

किती शिकला आहे टायगर श्रॉफ?

टायगर श्रॉफ हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. टायगर श्रॉफचा जन्म २ मार्च १९९० रोजी मुंबईत झाला. त्याचे मूळ नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. ३६ वर्षीय अभिनेत्याने आपली शालेय शिक्षण ‘अमेरिकन स्कूल ऑफ मुंबई’मधून पूर्ण केले आहे, तर पुढील शिक्षणासाठी त्याने ‘अमिटी युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. असे सांगितले जाते की, टायगरचे मन अभ्यासापेक्षा मार्शल आर्ट आणि खेळामध्ये जास्त रमयचे, ज्यामुळे तो आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही.

तायक्वांडोमध्ये मिळाला आहे ब्लॅक बेल्ट

खेळ आणि मार्शल आर्टमध्ये आवड असणाऱ्या टायगरने वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षीच तायक्वांडो शिकण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, अहवालानुसार २०१४ मध्ये त्याला तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट देखील मिळाला आहे. २०१४ मध्येच टायगर श्रॉफने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. २०१४ मध्ये आलेल्या ‘हिरोपंती’ या त्याच्या पहिल्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर त्याने अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले.

Mahabaleshwar Environment News: उंच कंपाउंडच्या आडून नेमकं चाललंय तरी काय? पर्यावरण कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

यापूर्वीही स्टार्सवर झाले आहेत हल्ले

टायगर श्रॉफवर गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही. टायगर श्रॉफपूर्वी या वर्षीच इतरही अनेक बॉलिवूड स्टार्सवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्या प्रकरणाची जबाबदारीही बिश्नोई गँगने घेतली होती. तसेच टायगर श्रॉफच्या प्रकरणामागेही बिश्नोई गँगचा हात असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावारही गोळीबार झाला होता.

NMC Medical Education: नॅशनल मेडिकल कमिशनचा मोठा निर्णय! २०२३ चे वैद्यकीय शिक्षणाचे ‘हे’ नियम तात्काळ प्रभावाने रद्द

💡

Frequently Asked Questions

  • Que: अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार कुठे आणि कसा घडला?

    Ans: ही घटना मुंबईच्या जुहू भागात घडली. रविवारच्या संध्याकाळी टायगर श्रॉफ फुटबॉल सामना खेळून कारमधून बाहेर पडत असताना बाईकवरील तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर सलग गोळीबार केला.

  • Que: अभिनेता टायगर श्रॉफचे शिक्षण किती झाले आहे?

    Ans: टायगर श्रॉफने आपले शालेय शिक्षण 'अमेरिकन स्कूल ऑफ मुंबई'मधून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी 'अमिटी युनिव्हर्सिटी'त प्रवेश घेतला होता, परंतु मार्शल आर्ट आणि खेळातील रुचीमुळे त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

Web Title: Tiger shroff firing incident juhu mumbai education news marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • tiger attack
  • tiger shroff

संबंधित बातम्या

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं
1

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
2

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!
3

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!
4

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.