Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Temperature: मुंबई कुडकुडली! येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Mumbai Weather: थंडीमुळे मुंबईकर चांगलेच गारठले असून रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होताना दिसत आहे. सोमवारी सकाळी 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2024 | 04:06 PM
येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद (फोटो सौजन्य-X)

येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Weather News In Marathi: ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. आधीच दमट वातावरण असलेल्या मुंबईतील नागरिक कमालीचे तापमान आणि उकाड्याने हैराण होत घामाने डबडबले होते. पण शेवटी मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागल्याचं दिसतंय. मुंबईत गेल्या 9 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई आणि सांताक्रूझ केंद्रात आज (9 डिसेंबर) 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये किमान तापमान 11.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले होते.

उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये धुराचे प्रचंड लोट पसरले आहे. तर राजस्थानमधील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत असून, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढल्याचं सांगण्यात येत असून येत्या 24 तासांत मुंबईकरांना हुडहुडी भरणार आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या हालचालींना वेग;वर्षावर शिंदे-फडणवीसांमध्ये तासभर खलबतं

मुंबई महाबळेश्वरपेक्षा थंड?

सर्वात थंड ठिकाण असलेल्या महाबळेश्वरच्या तुलनेत आज मुंबईत किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई गारठली असून गेल्या नऊ वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रात 13.7 अंश सेल्सिअस होती. या भागात किमान तापमान 19.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

येत्या २४ तासांत थंडीची तीव्रता वाढणार

मुंबईकरांना आता स्वेटर आणि कानटोप्या बाहेर काढावे लागणार आहे. आज मुंबईत गेल्या 9 वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले असून मुंबईला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या २४ तासांत मुंबई, नाशिक आणि पुण्यनगरीत थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

नाशिक, पुण्याताही कडक वधाळा

थंडी आणि अवकाळी पावसामुळे तापमान वाढले असते. नाशिक शहरातील पारा 9.4 अंश सेल्सिअस असताना निफाडमध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असती. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थंडी गायब झाली होती. आता पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. येत्या १५ दिवसांत पुण्याला मोठा फटका बसणार आहे.भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात 13 ते 14 अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान 11 अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

थंडीमुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होताना दिसत आहे. रविवारी 17.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारी सकाळी 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये 13.7 अंश सेल्सिअसची थंडी नोंदवण्यात आली, जी आतापर्यंतची सर्वात कमी आहे. अवघ्या तीन दिवसांत तापमान 11 अंशांनी घसरले जे सामान्यपेक्षा 5.6 अंशांनी कमी आहे. दुसरीकडे कुलाबा वेधशाळेत 19.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच महाविकास आघाडीने केली ‘ही’ मोठी मागणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Web Title: Mumbai temp dips to 13 7 degree celsius city wakes up to coldest december day since 2015

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 04:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.