मुंबई: महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आता कधीही निवडणुका झाल्या तरी आम्ही तयार आहोत, असा विश्वासही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबावरही निशाणा साधला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात.
दरम्यान, येत्या 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. पण निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ” आता सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवू लागला आहे. आता सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक आयोगाला कार्यक्रम दिले जातात. सत्ताधारी पक्षांकडून निवडणुकांचे निर्णय घेतले जात असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: यंदाचा साहित्यक्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; दक्षिण कोरियाच्या लेखिकेला मिळाला बहुमान
महाराष्ट्राच्या निवडणुकाही हरयाणा आणि जम्मू कश्मीरसोबत होणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधारी पक्षाला ते सोयीचे न वाटल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हरयाणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यांच्या निवडणुकांसोबत वेळ देणे शक्य नसल्याने महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केल्या नाही, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला. जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो त्यावेळी ते परदेशात जातात आणि ते ज्यावेळी परदेशात नसतात, त्यावेळी ते कोणत्यातही प्रचारात असतात. आपल्या पंतप्रधानांना ही दोनच कामे आहेत. असं दिसते. असा टोलाही त्यांनी लगावला.
येत्या आठवडाभरात आचारसंहिता लागेल असे सत्ताधारी पक्ष सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. पण निवडणुका कधीही होऊ द्या आमची पूर्ण तयारी झाली आहे. पण त्यांनी इव्हीएम मशीन कुठे दडवून ठेवले आहेत. त्यात बंद दाराआड काय कुरापती केल्या जातात यावर आम्हाला लक्ष ठेवावं लागेल, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.वाचा