Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतून ठाकरे बंधू गायब; तर पवार 77 व्या स्थानी, एकनाथ शिंदे 51 व्या क्रमांकावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6 व्या क्रमांकावर स्थिर आहेत. गेल्यावर्षीच्या यादीतही तिघे याच स्थानी होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2025 | 02:16 PM
देशातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर

देशातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई / अनिकेत जोशी : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तसेच आपल्या कामाने छाप पाडणाऱ्या मोजक्या 100 महान व्यक्तींची यादी शुक्रवारी प्रकाशित झाली असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6 व्या क्रमांकावर स्थिर आहेत. गेल्यावर्षीच्या यादीतही तिघे याच स्थानी होते. तथापि, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षीच्या 50 व्या स्थानावरून थेट 13 व्या स्थानी झेप घेतली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे या बंधूंचा मात्र या महत्वाच्या शंभर नेत्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यादीत नवव्या स्थानी दिसत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांना पुष्कळ मागे म्हणजे 77 व्या स्थानी टाकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे 57 व्या स्थानी आले आहेत. ‘मातोश्री’च्या ठाकरेंना मागे सोडून स्वतःचा राजकीय मार्ग प्रशस्त करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 51 व्या स्थानी दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव सहन केला आणि नंतरच्या 6 महिन्यांतच त्यांनी तितकाच मोठा विधानसभा विजय मिळवला. महायुतीने 235 जागांचे अतिप्रचंड असे बहुमत विधानसभेत मिळवले. त्यात भाजपाचे 135 आमदार आहेत. देश स्तरावर त्यांच्या नेतृत्वाची दखल घेतली जाण्याचे हे एक प्रमुख कारण दिसते. त्याचबरोबर महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीचा मोठा ओघ त्यांनी आणला. राज्याला एक ट्रीलयन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महायुतीच्या धडपडीची दखल देशात घेतली गेली आहे. मुंबई पालिकेच्या येणाऱ्या निवडणुका हे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे.

केजरीवालांची घसरण, यादीत 52 व्या स्थानावर

गेल्या वर्षी देशातील 18 वे महत्वाचे नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांची नोंद झाली होती. त्यावेळी त्यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष मोदींना आव्हान देऊ शकेल असेही  मानले जात होते, पण दिल्लीतील पराभवानंतर तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांत तुरुंगवारी घडल्यानंतर केजरीवाल यांची यादीतील घसरण थेट ५२ व्या स्थानावर झाली आहे

चंद्राबाबू नायडूंचा प्रथमच समावेश

फडणवीसांपाठोपाठ चंद्रबाबू नायडू यांचा १४ वा क्रमांक आहे. त्यांचे नाव अशा महत्वपूर्ण नेत्यांच्या यादीत प्रथमच घेतले गेले आहे. आंध्रप्रदेशाला २०४७ पर्यंत सुवर्णाध्र बनवण्याची योजना आखून चंद्राबाबू कामाला लागले आहे. अवघ्या दीड वर्षापूर्वी त्यांची राजकीय स्थिती बिकट होती. त्यातून टीडीपी पक्षाला बाहेर काढून त्यांनी वायएसआरसीपी पक्षाला हरवले. भाजपा व जनसेवा पक्षाबरोबर युती करून आंधात विजय मिळवला.

Web Title: Pm narendra modi tops the list of most influential people in the country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Indian Political News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
1

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
2

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती
3

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
4

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.