Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषदेत  महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढण्याची शक्यता; सभापती विरोधीपक्षनेत्यांसह दहा जण होणार निवृत्त!

राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १०जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे. तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे(Possibility of increasing the number of Mahavikas Aghadi in the Legislative Council; Ten will retire, including Speaker and Leader of Opposition!).

  • By किशोर आपटे
Updated On: Mar 18, 2022 | 10:37 PM
विधानपरिषदेत  महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढण्याची शक्यता; सभापती विरोधीपक्षनेत्यांसह दहा जण होणार निवृत्त!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १०जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे. तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे(Possibility of increasing the number of Mahavikas Aghadi in the Legislative Council; Ten will retire, including Speaker and Leader of Opposition!).

सभापती, विरोधीपक्षनेते निवृत्त होणार?

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे.त्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते,भाजपचे आमदार प्रसाद लाड, सुरजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाशिव खोत, राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांचा समावेश आहे. भाजपचे आमदार रामनिवास सत्यनारायण सिंह यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असून,त्यांचीही मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत आहे. ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे.

सध्या विधानसभेत महाविकास आघाडीचे १७५ संख्याबळ आहे त्यात शिवसेना  ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४३ (कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त) तर भाजप १०६, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, एम.आय.एम.२, प्रहार जनशक्ती२, मनसे१, क्रांतिकारी शेतकरी पक्ष-१ जनसुराज्य शक्ती पक्ष-१, शेकाप-१, राष्ट्रीय समाज पक्ष-१ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्सवादी) १,अपक्ष १३ असे संख्याबळ आहे.

महाविकास आघाडी सहा जागा जिंकू शकते

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून,बहुमतावेळी या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला विधानपरिषदेवर ५ जणांना पाठविण्याची संधी मिळू शकते. काही अपक्ष आमदार आणि अन्य पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सहावी जागा जिंकू शकते. विधानपरिषदेतील रिक्त होणा-या एकूण जागापैकी भाजपच्या वाट्याच्या ६ जागा रिक्त होत आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार निवृत्त होत आहे.

भाजपचे सख्याबळ पाहता आणि त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांची साथ मिळाल्यास भाजपचे ४ आमदार विधानपरिषदेवर जावू शकतात. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची विधानपरिषदेतील कामगिरी पाहता त्यांना दुस-यांदा संधी दिली जावू शकते.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अशी ओळख असलेले प्रसाद लाड यांच्याही नावाचा विचार होवू शकतो. काही अपक्ष आणि इतर पक्षांनी भाजपला साथ दिली असल्याने हे पक्ष भाजपकडे जागांची मागणी करण्याची शक्यता असल्याने विधानपरिषदेची उमेदवारी देताना भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

उपनेते आदेश बांदेकरनाही संधीची शक्यता

शिवसेनेकडून विद्यमान आमदार सुभाष देसाई यांना संधी दिली जावू शकते. तसेच अभिनेते आणि शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलैला तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत असल्याने या निवडणुका जून मध्ये होण्याची शक्यता आहे.

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Possibility of increasing the number of mahavikas aghadi in the legislative council ten will retire including speaker and leader of opposition nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2022 | 10:37 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
1

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी
2

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान
3

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान

Uddhav Thackeray News:  ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray News: ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.