Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी

Mahavikas Aghadi : गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. चार वर्षांत दुसऱ्यांदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 25, 2026 | 06:01 PM
Mahavikas Aghadi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole, Sanjay Raut,

Mahavikas Aghadi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole, Sanjay Raut,

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या भुकंपाची चिन्हे
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील बैठकीला उपस्थित नव्हते
  • गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश
Mahavikas Aaghdi Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या भुकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याचे कारण म्हणजे बुधवारी संध्याकाळी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे ६० पैकी २३ आमदार गैरहजर होते, अशी माहिती समोर आली आहे. आमदारांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सहा विश्वासू खासदारांनी नुकताच ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश् उपस्थित होऊ लागले आहेत. या कठीण काळात उद्धव ठाकरे यांची नाराजीही उघडपणे समोर आली. या बैठकीत त्यांनी उपस्थित नेत्यांना “आपण खरोखरच एकत्र आहोत का?” असा थेट प्रश्न विचारला.

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीना

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी रणनीती आखण्याच्या उद्देशाने बोलावण्यात आलेल्या या बैठकीत अनेक प्रमुख नेते आणि आमदार अनुपस्थित होते. पण त्याचवेळी २३ आमदार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील बैठकीला आले नव्हते. वैयक्तिक कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे.

तर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे देखील बैठकीला गैरहजर होते. वडेट्टीवार यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.

‘सत्ता डोक्यात गेली का?’ पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल

गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. चार वर्षांत दुसऱ्यांदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

बंडखोर खासदारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नेत्यांना आवाहन केले की, “आपण आपल्यासोबत असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे निघून गेले, त्यांना जाऊ द्या. आपण म्हणतो की आपण एकत्र आहोत. पण सभागृहात महाविकास आघाडी म्हणून आपण एकजूट आहोत का? आपण एकत्रितपणे मुद्दे मांडतो का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि एकतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

 

Web Title: Mahavikas aghadi political crisis 23 mlas absent uddhav thackeray questions alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Nana patole
  • sanjay raut
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
1

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
2

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार
3

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’
4

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.