Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2026: ‘श्रीराम जन्मले गं सखे…! भोईवाड्यातील १५० वर्षांच्या राम मंदिरात अनोखी परंपरा

“जय श्रीराम”च्या घोषात आणि “राम जन्मला गं सखे...”च्या सुरांत वातावरण दुमदुमले. पहाटेपासून भजन-कीर्तन, दुपारी रामजन्म सोहळे आणि संध्याकाळी पालख्या, मिरवणुका यामुळे शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचा रंग चढला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 26, 2026 | 07:35 PM
Ram Navami 2026: ‘श्रीराम जन्मले गं सखे…! भोईवाड्यातील १५० वर्षांच्या राम मंदिरात अनोखी परंपरा
Follow Us
Follow Us:
  • भोईवाड्यातील १५० वर्षांच्या राम मंदिरात अनोखी परंपरा
  • पालखी हातात घेऊन नृत्य करण्याची प्रथा आजही जिवंत
  • जुन्या मंदिरांपासून ते गल्लोगल्लीतल्या मंडळांपर्यंत रामभक्तीचा सोहळा
मुंबई: रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईत भक्तिरसाचा उत्साह ओसंडून वाहत असून मंदिरांमध्ये “जय श्रीराम”च्या घोषात आणि “राम जन्मला गं सखे…”च्या सुरांत वातावरण दुमदुमले. पहाटेपासून भजन-कीर्तन, दुपारी रामजन्म सोहळे आणि संध्याकाळी पालख्या, मिरवणुका यामुळे शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचा रंग चढला आहे. जुन्या मंदिरांपासून ते गल्लोगल्लीतल्या मंडळांपर्यंत रामभक्तीचा हा सोहळा साजरा होताना दिसला. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम मुंबईत अनुभवायला मिळत आहे.

परळमधील भोईवाडा परिसरात वसलेल्या १५० वर्षे जुन्या भोईवाडा श्री राम मंदिरात यंदाचा रामनवमी उत्सव पारंपरिक भक्तिरसात न्हाऊन निघाला. “राम जन्मला गं सखे…” या जल्लोषात येथे जपली जाणारी एक अनोखी परंपरा पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पालखी हातात घेऊन नाचवण्याची. शहरात कदाचित एकमेव ठिकाणी जपली गेलेली ही परंपरा कोकणातील परंपरेशी जोडणारा जिवंत दुवा ठरते.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक शैलीत उभारलेले बांधकाम आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली सांस्कृतिक परंपरा. मंदिराचे विश्वस्त विरेंद्र केशरीनाथ ठाकूर आणि त्यांच्या पत्नी विनिता ठाकूर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रामजन्म सोहळ्याचे आयोजन केले. सकाळपासूनच भक्तीभावाने वातावरण भारून गेले होते. पहाटे कलावती आई यांच्या भजनांनी उत्सवाची सुरुवात झाली, तर दुपारी आंब्रे गुरुजींच्या कीर्तनाने भक्तीचा रंग अधिकच गडद झाला. दुपारी रामजन्माचा सोहळा पार पडताच “राम जन्मला गं सखे…”च्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. याच वेळी साईबाबांची पालखी मंदिरात दाखल झाली आणि भक्तीमय वातावरणात रंग भरला.

संध्याकाळी सहा वाजता रामाची पालखी निघाली आणि भोईवाडा गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पालखी हातात घेऊन नाचवण्याची परंपरा विशेष आकर्षण ठरली. ढोल-ताशांच्या तालावर, अभंगांच्या सुरावटीत आणि “जय श्रीराम”च्या घोषात भक्तांनी पालखी नाचवत गाव प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा मंदिरात परतले. काही घरांच्या अंगणात पालखी थांबून त्या घरातील देव पालखीच्या भेटीला येत असतात. यंदाच्या उत्सवात सामाजिक स्पर्शही जाणवला. लहान मुलांसाठी रामाच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला, तर डॉक्टर अजित पवार आणि त्यांच्या वडिलांनी भजन सादर करून उत्सवात सहभाग घेतला. शहरीकरणाच्या वेगात हरवत चाललेल्या परंपरांच्या पार्श्वभूमीवर भोईवाडा येथील हे राम मंदिर आजही संस्कृतीची ओळख जपणारे केंद्र ठरते. पालखी नाचवण्याची परंपरा केवळ धार्मिक विधी नसून, ती समुदायाच्या एकात्मतेची आणि सांस्कृतिक सातत्याची जिवंत अभिव्यक्ती आहे.

पवईत श्रीरामनवमीनिमित्त श्री साईसच्चरित अखंड पारायण

पवईतील आय. आय. टी. मेन गेट जवळील साईनाथ नगर ‘साई मित्र मंडळ’ यंदा आपल्या उत्सवाचे ४५ वे वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामनवमीच्या औचित्यावर ‘श्री साईसच्चरित अखंड पारायण’ आणि ‘साई भंडारा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी श्री साईसच्चरित चक्रीय अखंड पारायण प्रारंभ झाले असून सायंकाळी साई भजन आणि रात्री साई प्रसाद तसेच गुरुवारी सकाळी ०८:०० वा: अखंड पारायण समाप्ती करून दुपारी १२:०० वा: श्री राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ‘साई भंडारा’ (महाप्रसाद) आयोजित करण्यात आले असल्याचे साई मित्र मंडळाचे अश्विन चव्हाण यांनी सांगितले. गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: Shriram janmotsav 150 year old ram temple bhoiwada tradition mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • ram mandir

संबंधित बातम्या

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले
1

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?
2

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.