Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

अयोध्या येथील राम मंदिर न्यासाच्या बँक खात्यातून झालेल्या चंदा चोरीच्या धक्कादायक प्रकरणावर एक मोठा खुलासा समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला या आर्थिक गैरव्यवहाराबाबत आधीच संशय आला होता, तरीही तिथला स्टाफ बदलण्यात आला नाही, ज्यामुळे ही फसवणूक पुढे चालू राहिली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 02:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ram Mandir Donation: अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या चोरी प्रकरणी आता एक मोठे प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाला सुमारे तीन महिन्यांपूर्वी देणग्यांमध्ये अनियमितता असल्याचा संशय आला होता. बँकेने रोकड मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शिफारस देखील करण्यात आली होती. पण असं असताना देखील त्यांच्या जागी नवे कर्मचारी नेमण्यात आले नाहीत. आता मात्र या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेच्या व्यवहारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नेमकं प्रकरण काय?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी

प्रकरणाची सुरुवात कुठून?

राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्या काही कर्मचारी मोजून जमा करत होते. याच दरम्यान, देणग्यांमध्ये तफावत निर्माण झाली आणि पैसे गायब झाल्याचा प्रकार घडला. तपासानंतर अनेक व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहेत. हा गैरव्यवहार किती काळापासून सुरू होता आणि त्यात कोणकोण सामील होतं, हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

SBI ला आधीच होता संशय

NDTVच्या वृत्तानुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी दानपेट्यांमधून पैसे गायब होत असल्याचा SBI ला संशय आला होता. यानंतर, बँकेने रोकड मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नेमण्याची शिफारसदेखील केली गेली होती. असे वृत्त आहे की, आउटसोर्सिंग एजन्सीने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारीही सुरू केली होती, परंतु त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नेमण्यात आले नाहीत.

नवीन कर्मचारी नेमण्यात का आला नाही?

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मंदिर ट्रस्टशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास विरोध केला होता. त्यामुळेच ते संशयास्पद कर्मचारी काम करत राहिले. आता हा तपासाचा एक मोठा मुद्दा बनला आहे की, इशारा देऊनही कारवाई का करण्यात आली नाही.

तपास कुठंपर्यंत पोहोचला?

या प्रकरणात राम मंदिर ट्रस्टशी संबंधित अनेक व्यक्तींची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंपत राय यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. इतर अनेक व्यक्तींनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. SIT च्या तपासात अनेक सुरक्षा त्रुटी आणि उल्लंघने उघडकीस आली आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, देणग्या मोजण्याच्या आणि जमा करण्याच्या प्रक्रियेत देखरेखीचा अभाव होता, ज्याचा गैरफायदा घेण्यात आला. अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

Web Title: Ram mandir donation theft case sbi bank negligence scam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Bank Fraud
  • Business News
  • Marathi News
  • ram mandir
  • ram mandir news
  • Sri Ram mandir

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.