मुंबई: गेले काही दिवस राज्यात तुफान पाऊस सुरु आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई व उपनगर भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील तानसा तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भागात पाणीपुरवठा हा ७न तलावांच्या माध्यमातून केला वाजतो. दरम्यान त्यापैकी तानसा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, तो ओसंडून वाहू लागला आहे.
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर काही दिवसांपूर्वी नोदक सागर तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सूर आहे.