Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रा वाघ-रोहिणी खडसे यांच्यातील वाद थांबता थांबेना; खडसेंनी ट्विट करून समाचारच घेतला; म्हणाल्या…

चित्रा वाघ यांच्या या विधानाला हरकत घेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केले होते. चित्रा वाघ यांचे वक्तव्य म्हणजे 'बिग बॉस'मधील सीन असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर माझी कामगिरी तुमच्या वडिलांना विचारा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2025 | 07:59 AM
माझ्या वडिलांची कारकीर्द आधी समजून घ्या: रोहिणी खडसे

माझ्या वडिलांची कारकीर्द आधी समजून घ्या: रोहिणी खडसे

Follow Us
Follow Us:

मुंबई : भाजप आमदार चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यातील वाद वाढत आहे. माझ्या वडिलांची कारकीर्द आधी समजून घ्या, असा पलटवार रोहिणी खडसे यांनी वाघ यांच्यावर केला. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी चित्रा वाघ यांनी अनिल परबांसारखे 56 पायाला बांधून फिरते, असे म्हटले होते.

चित्रा वाघ यांच्या या विधानाला हरकत घेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केले होते. चित्रा वाघ यांचे वक्तव्य म्हणजे ‘बिग बॉस’मधील सीन असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर माझी कामगिरी तुमच्या वडिलांना विचारा, ते माझ्यासमोरच बसतात, असे प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिले होते.

माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं… तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या… — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 22, 2025

चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा शनिवारी रोहिणी खडसे यांनी पुन्हा समाचार घेत एक्स सोशल मीडियावर म्हटले की, ‘माझ्या वडिलांचे नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय, याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं’.

…त्या झाडाच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट

तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात, त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते. चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत.

आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला

शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत. त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला. उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको, अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.

Web Title: The controversy between chitra wagh and rohini khadse continues till now nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 07:59 AM

Topics:  

  • chitra wagh
  • Maharashtra Politics
  • Rohini Khadse

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.