Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींचा इतिहास उलगडणार, प्रदर्शनीय फलक शाळा, कॉलेजातही झळकणार

महापुरुषांचे देशाच्या इतिहासामध्ये खूपच मोठे योगदान आहे आणि या राष्ट्रपुरुषांची आणि थोर व्यक्तिमत्वांची जयंती साजरी करताना आता त्यांचे फलक झळकविण्यात यावेत अशी केलेली मागणी मान्य झाली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 11, 2025 | 05:48 PM
काय होती मागणी, मंगलप्रभात लोढा यांनी सोशल मीडियावर केले शेअर

काय होती मागणी, मंगलप्रभात लोढा यांनी सोशल मीडियावर केले शेअर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईः देशाच्या इतिहासात राष्ट्र पुरुष थोर महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींची जयंती साजरी करताना प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असे परिपत्रक राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालय, शासकीय कार्यालये महाविद्यालय शाळा यांनाही यापुढे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचा इतिहास उलगडावा यासाठी प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. 

देशाच्या इतिहासात राष्ट्रपुरुष थोर महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींची जयंती साजरी करताना प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असे परिपत्रक राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले आहे.  दरम्यान, मंत्रालय, शासकीय कार्यालये महाविद्यालय शाळा यांनाही यापुढे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचा इतिहास उलगडावा यासाठी प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. 

Maha Vikas Aghadi broke : शिवसेना तर पडली महाविकास आघाडीच्या बाहेर! कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे तरी काय?

जयंतीदरम्यान फलकही लावावेत 

महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमांच्या वेळी सर्वसामान्य जनतेस महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी शासनाने थोर महापुरुषांची जयंती असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलकही लावण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. शुक्रवारी याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलकही लावण्यात येतील. तसेच ‘जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या देशाला अनेक थोर व्यक्तींचा आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास लाभला आहे आणि पुढच्या पिढीला याची माहिती योग्यरित्या मिळायला हवी. इतकंच नाही तर पुढच्या पिढीला शाळा आणि महाविद्यालयातून याचे महत्त्वही कळायला हवे आणि ते फलकाद्वांरेही समोर दिसायला हवे. शासनाच्या संकेतस्थळावरही याची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे आणि हा खरंच एक स्तुत्य प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. 

त्या पत्राची घेतली दखल 

या मागणीसाठी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना गेल्यावर्षी पत्र लिहिले होते. हे पत्र लिहिताना राज्याच्या सर्व शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी लोढा यांनी या पत्रात केली होती अखेर ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे नक्कीच आनंदाचे वातावरण आहे. तर आता ही मागणी मान्य झाल्यानंतर शाळा, कॉलेजात अंमलबजावणी बंधनकारक असल्याचेही आता समोर आले आहे. 

मोठी बातमी! महाविकास आघाडी तुटली; मुंबई ते नागपूरपर्यंत शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

असे आहे परिपत्रक 

Web Title: The history of national heroes and great personalities will be revealed exhibition boards will also be displayed in schools and colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Latest Political News
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
1

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…
2

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास
3

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य; राज्यात राबवले जाणार स्वच्छता अभियान
4

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य; राज्यात राबवले जाणार स्वच्छता अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.