Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईत आता मुंबईची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी ' जनहित सुरक्षा समित्या' स्थापन होणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 13, 2026 | 08:35 PM
मंगलप्रभात लोढा आक्रमक (Photo Credit- X)

मंगलप्रभात लोढा आक्रमक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका!
  • मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार
  • मंगलप्रभात लोढा आक्रमक
मुंबई: मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात कार्यवाही करत असून उपनगर जिल्हा नियोजन बैठकीनंतर या कारवाईला अधिक वेग येणार आहे. मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईत आता मुंबईची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी ‘ जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार आहेत. मंत्री लोढा यांनी नुकत्याच झालेल्या उपनगर जिल्हा नियोजन बैठकीत बांगलादेशींच्या शोध घेऊन कडक कारवाईच्या पाठपुराव्यासाठी जनहित सुरक्षा समित्या स्थापन करण्याची सूचना केली होती.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा आणि तिथल्या अमलीपदार्थ माफियांचा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन बैठकीतही प्रामुख्याने हा मुद्दा चर्चिला गेला. मुंबईला बसत असलेला घुसखोरांचा विळखा आणि धोक्यात येत असलेली मुंबईची सुरक्षितता यावर गांभीर्याने चर्चा झाल्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीतच मंत्री लोढा यांनी जनहित सुरक्षा समिती स्थापन करण्याबाबतची आपली भूमिका मांडली. घुसखोरीची समस्या अक्राळ विक्राळ रूप धारण करून असून शहराच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यासंदर्भात मंत्री लोढा यांनी म्हटले की, मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीमुळे इथली सुरक्षा धोक्यात आली आहे. घुसखोरांवर कारवाई ही काळाची गरज आहे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असून प्रशासन जनहित सुरक्षा समितीच्या स्थापने संदर्भात त्वरित कार्यवाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

जनहित सुरक्षा समितीच्या कार्याचे स्वरूप

विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर ही समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून शहरातल्या विविध भागात बनावट आधार कार्ड आणि बनावट रेशन कार्ड देणाऱ्यांचा विशेष मोहिमेद्वारे शोध घेण्यात येईल. या शोधानंतर संबंधितांची माहिती समितीकडून पोलिसांना दिली जाईल. मुंबई उपनगरांतील सरकारी जमिनींवर असणारी अतिक्रमणे शोधण्यासाठीही समिती मदत करणार आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल समितीकडून पोलिसांना दिला जाईल. या जनहित सुरक्षा समितीत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, पोलिस विभागातील अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेतील सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यात इतरत्र ही समिती स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्याचा विचार असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.

मंत्री लोढा यांच्या पाठपुराव्याने हजार कोटींची जमीन पुन्हा सरकारी ताब्यात

मालाड मालवणी भागात मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनीच दिले होते. गेल्या वर्षभरात सातत्याने त्यांनी या कारवाईचा पाठपुरावा केला असून अनधिकृत बांधकामावर कारवाई अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत गेल्या वर्षभरात केवळ पश्चिम उपनगरात १५ एकर जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला असून या जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात आल्या आहेत. एक हजार कोटींपेक्षा जास्त या जमिनीची किमती असल्याची माहिती पश्चिम उपनगर (अतिक्रमण निष्कासन) अतिरिक्त आयुक्त श्री.गणेश मिसाळ यांनी ही माहिती दिली. धडक मोहीम अद्यापही सुरूच असल्याचे मिसाळ म्हणाले.

दरम्यान सहपालकमंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, जनहित सुरक्षा समितीच्या या निर्णयामुळे घुसखोरीला प्रतिबंध होण्यास मदत मिळणार असून मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा असेल. याबाबत प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…; ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Web Title: Mumbai janhit suraksha samiti action against infiltrators mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Bangladeshi Muslim
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’
1

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश
2

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ
3

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’
4

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.