पोलिस हेल्पलाईनवर ९५,००० तक्रारी, तब्बल ६० टक्क्यांहून अधिक वाढ
प्रवासातील अडचणी सोडविण्यासह, मदतीसाठी प्रवासी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर फोन करतात. या हेल्पलाईनवर प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींच्या संख्येत तब्बल ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये रोज प्रवाशांच्या सरासरी ६० तक्रारी येत होत्या, मात्र वर्ष २०२४ मध्ये हीच संख्या १०९ वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक तक्रारी प्रवासा दरम्यान बॅग हरवल्याच्या आहेत. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर एकूण ९५ हजारांहून अधिक फोन कॉल आले होते. त्यापैकी केवळ ४०२ कॉलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य तक्रारी ऐकून घेऊन त्यावर जागेवरच तोडगा काढून मिटवल्या आहेत. हेल्पलाइनवर येणारे ९९ टक्के कॉल तक्रारींचे आहेत. मात्र अवघ्या एक टक्क्याहून कमी कॉल गुन्हा दाखल करण्यास योग्य आहेत.
Baramati Crime: एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत
सर्वप्रथम समुपदेशन
मोबाइल चोरीपासून डब्यात अनधिकृतपणे पत्ते खेळण्यापर्यंतच्या तक्रारी हेल्पलाइनच्या माध्यमाने पोलिसांकडे नोंदवण्यात येतात. सर्व तक्रारींची नोंद घेतली जाते. प्रकरणाचे गांभीर्य पाहून गुन्हा दाखल केला जातो. हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे सर्वप्रथम समुपदेशनाने आणि त्यानंतर घटनास्थळी पोलिस पाठवून अडचणी सोडवल्या जातात. धकाधकीच्या जीवनात महिलांचा प्रवास कठीण होतो. खास करुन प्रवास करताना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. प्रवास करताना अनेक प्रसंगांसह वस्तू गहाळ होण्याचे प्रमाण असते. यासाठी हेल्पलाईन नंबर देण्यात आला.
Bihar Crime पुन्हा ‘सैराट’ची पुनरावृत्ती; प्रेमविवाहाच्या रागातून तरूणाची गोळ्या झाडून हत्या
३२ प्रकारच्या तक्रारी
बॅग हरवणे, बॅग सापडणे, प्रवाशांमधील भांडण, नशेखोरांचा वावर, गस्ती सुरक्षारक्षकांची अनुपस्थिती, मद्यपान करून प्रवास, दिव्यांग डब्यात घुसखोरी, फेरीवाले, भिकारी, जखमी, रेल्वे पोलिस / सरकारी कर्मचाऱ्यांची अयोग्य वर्तणूक, व्यक्ती हरवली, व्यक्ती सापडली, महिलेची छेडछाड, आजारी पडणे, स्टंट करणे, दगडफेक, चोरी, तृतीयपंथीयांचा त्रासदायक वावर, आरक्षित डब्यातून प्रवास, संशयास्पद व्यक्तीचा वावर, पाकीटचोरी, पत्ते खेळणे, भजन गाणे, सोनसाखळी ओढणे, मोबाइल चोरी, बॉम्बने उडवण्याची धमकी, माहिती न मिळणे, दरोडा आणि अन्य (वरील तक्रारी वगळता अन्य तक्रार) अशा ३२ प्रकारच्या तक्रारी हेल्पलाइनवर नोंदवण्यात येतात.