Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव ट्रक आणि कारसहीत दोन दुचाकींचा अपघात, विचित्र अपघातात पुणे-नगर मार्गावर पाच ठार, तीन जण गंभीर जखमी

रविवारी सायंकाळी पुणे-अहमदनगर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या अपघातामध्ये इतर पाचजण जखमी झाले आहे. एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि दोन गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 24, 2022 | 11:15 AM
भरधाव ट्रक आणि कारसहीत दोन दुचाकींचा अपघात, विचित्र अपघातात पुणे-नगर मार्गावर पाच ठार, तीन जण गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : रविवारी सायंकाळी पुणे-अहमदनगर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या अपघातामध्ये इतर पाचजण जखमी झाले आहे. एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि दोन गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हा विचित्र अपघात एवढा भयानक होता की, दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला गेलेल्या ट्रकने आधी समोरुन येणाऱ्या एका एमयुव्हीला धडक दिली. या गाडीमध्ये सहा प्रवासी होते. त्यानंतर या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये गाडीमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर उपचार सुरु आहे. दुचाकीवरील जोडप्याचाही मृत्यू झालाय. दरम्यान ट्रकने ज्या गाडीला धडक दिली तिला मागून दुसऱ्या एका दुचाकीनेही धडक दिल्याने त्यावरील दोघेही जखमी झालेत, अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रणजीत पाथरे यांनी दिलीय. मृत्य पावलेल्यांपैकी तिघांची नाव समोर आली आहेत. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा हिंगाडे, लीना नीकसे अशी मृतांपैकी तिघांची नाव असून अन्य दोघांची नावे समजू शकलेली नाहीत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे

हा अपघात शिक्रापूरजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर हा अपघात उघडला. शिक्रापूर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शिक्रापूरपासून सहा किलोमीटरवर हा अपघात झाला. रस्त्याच्या मधील दुभाजक तोडून ट्रक बाजूच्या मार्गिकेमध्ये घुसला आणि त्याने समोरुन येणाऱ्या गाड्यांना धडक दिली. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Two killed three injured in pune nagar road accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2022 | 11:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.