देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक
मुंबई: शहरातील अनेक बस मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रिक्षा-टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यापासून रिक्शा-टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना जादा पैसे मोजून रोजचा प्रवास करावा लागत आहे. प्रवास खर्च वाढल्याने शेअर रिक्षा-टॅक्सीची मागणी वाढत आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ फार महत्वाची आहे. त्यामुळे मुंबईकर एका-एका मिनिटांचा विचार करतात. परंतु सध्या बेस्टच्या बसची संख्या कमी असल्याने शहरातील काही बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर अनेक बस मार्गावर बस ४५ ते ५० मिनिटांनी येते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशातच १ फेब्रुवारी पासून मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडे दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना एक किलोमीटर जाण्यासाठी देखील रिक्शाकरिता २६ आणि टॅक्सीकरिता २८ रुपये मोजावे लागत आहे.
शेअर रिक्षांसाठीही जादा पैसे प्रवास खर्च वाढल्याने शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची मागणी वाढलीआहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची संख्या वाढली आहे. शेअर रिक्षा-टॅक्सीमध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी पीक अवरमध्ये रेल्वे स्टेशन ते कार्यालय, गृह संकुलांदरम्यान शेअर रिक्षा-टॅक्सी चालविण्यात येते. त्यानंतरच्या वेळेत रिक्षा-टॅक्सी मीटरप्रमाणे धावतात पूर्व आणि पश्चिम उपनगरात शेअर रिक्षा मोठ्या प्रमाणात धावतात. परंतु याकरिता मुंबईकरांना थोड़े जादा पैसे मोजावे लागत आहेत.
Santosh Deshmukh Case : ‘…हे तर गृहखात्याचं अपयश’; संजय राऊतांची टीका
बेस्टच्या स्वमालकीच्या एक हजार बसवी वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. येत्या काही वर्षांत त्या भंगारात जाणार आहे. त्यामुळे बस अभावी हळुहळू अनेक मार्गावरील बस मार्ग बंद करण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर येणार आहे. घाटकोपर ते अंधेरी दरम्यान मेट्रो १ धावते. त्यामुळे या दरम्यानच्या प्रवाशांची रस्ते वाहतूकीच्या कोडींतून सुटका झाली असून त्यांना बसकरिता वाट पहावी लागत नाही. परंतु मेट्रोच्या एकेरी प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागतात.
10 लाखांच्या चोरीच्या 6 तासात लागला छडा; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
बेस्टच्या प्रवासाकरिता ५ रुपये लागतात. तेथे आता शेअर रिक्शाकरिता १२ रुपये तर टॅक्सी करिता १५ ते २० रुपये प्रति प्रवासी द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडत आहेत. त्यातच एका घरातील तीन ते चार सदस्य कामानिमित्त, महाविद्यालयात जात असतील तर त्यांचा महिन्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बेस्टच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहेत. शेअर रिक्शा-टॅक्सीमुळे मुंबईकरांचा प्रवास बेस्टच्या बसच्या तुलनेत वेगवान झाला असला तरी त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
चर्चगेटकडून कुलाबा, नरीमनपॉईंट आदी परिसरात जाणाऱ्या बस आहेत, पण शेअर टॅक्सीधी सेवा जास्त आहे. त्यामुळे प्रवासी शेअर टॅक्सीची वाट धरतात. काही प्रवासी ग्रुप करून चालत सीएसएमटी स्थानकापर्यंत येतात.